कांद्याच्या माळा घालून राजगुरुनगरात मोर्चा!

राजगुरुनगर :राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने भाववाढीविरोधात खेड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

भाववाढीविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक : तहसील कार्यालयावर धरणे

राजगुरुनगर – गडगडले कांद्याचे भाव, पेट्रोल, डीझेल, गॅस व जीवनोपयोगी वस्तूंच्या भाव वाढीविरोधात आज (सोमवारी) खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून राजगुरुनगरतून मोर्चा काढला. खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने भाव वाढीच्या निषेधार्थ आज खेड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाची सुरुवात पुणे-नाशिक महार्गावरील बाजार समितीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देत शहारातून खेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी केले यावेळी प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील, जिल्ह्याचे युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, प्रतीक मोहिते पाटील, उपाध्यक्ष संभाजी खराबी, तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, महिला आघाडी अध्यक्ष संध्याताई जाधव, युवक अध्यक्ष कैलास लिंभोरे, बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले, उपसभापती सुरेखा टोपे, संचालक अशोक राक्षे, विलास कातोरे, जिल्हा परिषद सदस्य दीपाली काळे, राहुल नायकवडी, संग्राम सांडभोर, उमेश गाडे, सुनील थिगळे यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रावादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

“चुकीच्या पद्धतीने कर्जमाफी केल्यामुळे राज्यातील 70 टक्के शेतकऱ्यांना तिचा फायदा मिळाला तर नाहीच, मात्र सोसायट्या आणि जिल्हा बॅंका अडचणीत आल्या. या सरकारने सहकार चळवळच मोडीत काढण्याचे जणू ठरवले आहे. फक्‍त जनतेला आशेला लावायचे आणि प्रत्यक्षात काही द्यायचे नाही अशी भाजप सरकारची भूमिका आहे.
– दिलीप मोहिते-पाटील, माजी आमदार.

या मोर्चाचे रूपांतर खेड तहसीलदार कार्यालयात धरणे आंदोलनात झाले. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार सुचित्रा आमले यांना माजी आमदार दिलीप मोहिते, रोहित पवार यांच्या हस्ते देण्यात आले. दरम्यान, चाकण येथील मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. हे सर्व गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी सचिन घोटकुले यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)