पुणे – रेबिज लस पशुसंवर्धन दवाखान्यांमध्ये होणार उपलब्ध

पुणे – जनावरांना कुत्र्याने चावा घेतल्यावर रेबिजची लस दिली जाते; परंतु, पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये ही लस उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी ठिकाणाहून लस विकत घेऊन त्यानंतर पशुसंवर्धन दवाखान्यात आणून ती लस जनावरांना दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाबरोबर मनस्तापही सहन करावा लागत होता. मात्र, आता ही रेबिज लस पशुसंवर्धन दवाखान्यांमध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी दिली.

जिल्ह्यात 8 लाखांहून अधिक जनावरांची (गाई, म्हैश, शेळी, मेंढी इ.) संख्या आहे. गावांकडे भटक्‍या कुत्र्यांचा सुळसुळात असतो. त्यामुळे अनेकवेळा ही भटकी कुत्री जनावरांच्या अंगावर धावून जातात आणि चावा घेतात. त्यामुळे जनावरांना रेबिजची लस द्यायची म्हटल्यावर शेतकऱ्याला लस विकत घ्यावी लागत होती. त्यानंतर पंचायत समितीकडे कागदपत्रे सादर केल्यानंतर त्या लसीचे पैसे मिळतात; परंतु शेतकऱ्यांना कागदपत्रे देताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे पैसे मिळतीलच याची शाश्‍वती नव्हती. मात्र, यापुढे शेतकऱ्यांना हा मनस्ताप होणार नसून, पशुसंवर्धन दवाखान्यातच ही लस उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना खासगी ठिकाणाहून लस खरेदी करण्याची आवश्‍यकता भासणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)