पुणे – पुणे-मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसला (गाडी क्र. 12127/12128) पुल-पुश तंत्रज्ञानाचा प्रायोगिक पद्धतीवर वापर करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांमध्ये या मार्गावर या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात येत होती. याला आणखी 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे 12 जून ते 26 जूनदरम्यान इंटरसिटी एक्स्प्रेस सुधारित वेळापत्रकानुसार धावणार आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार, पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस सायंकाळी 6.30 ऐवजी 6.25 वाजता सुटेल. ती लोणावळा-7.04 वा., कर्जत-7.47 वा., कल्याण – 8.15 वा., दादर येथे 8.41 वाजता दाखल होणार आहे. तर मुंबई (सीएसएमटी) येथे पूर्वीच्याच वेळेनुसार रात्री 9 वाजून 5 मिनिटांनी पोहोचेल. तर, मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सकाळी 6.45 ऐवजी 6.50 वाजता सुटेल. ती दादर- 6.59 वा., ठाणे-7.17 वा., कल्याण-7.36 वा., कर्जत 8.06 वा., लोणावळा-8.37 वा. तर पुणे स्थानकात 9.30 वाजता पोहोचणार आहे.