पुणे – म्हाडाच्या घरांसाठी दोन दिवसांत प्रक्रिया

4 हजार 700 घरे : मार्च महिन्यात ऑनलाइन सोडत

पुणे – पुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने (म्हाडा) 4 हजार 700 घरांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. ही घरे पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली, सोलापूर या चार जिल्ह्यांमधील असून, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऑनलाइन सोडत जाहीर केली जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा जिल्हा वगळता अन्य चार जिल्ह्यांमधील 4 हजार 700 घरांसाठी येत्या दोन दिवसांत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड, चाकण एमआयडीसी येथील म्हाळुंगे गाव आदी परिसरातील ही घरे आहेत. वन आरके, वन बीएचके, टू बीएचके आणि रो हाऊस आदी प्रकारची ही घरे आहेत, असे म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी सांगितले.

अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन केली जाणार आहे. म्हाडाच्या वेबसाइटवरून नागरिकांना अर्ज भरावे लागणार आहेत. नियोजित वेळेमध्ये नागरिकांना अर्ज सादर करणे अत्यावश्‍यक आहे. सोडतदेखील मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऑनलाइन जाहीर केली जाणार आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

गेल्यावर्षी दोनवेळा सोडत
म्हाडाकडून गेल्यावर्षी दोनवेळा सोडत काढण्यात आली. मे-2018 मध्ये 3 हजार 139 घरे आणि 29 भूखंडांच्या विक्रीची प्रक्रिया करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 80 घरे या नांदेड सिटीमधील होती. त्यानंतर डिसेंबर-2018 मध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीतील 242 आणि पिंपरी-चिंचवडमधील 570 अशा 812 घरांसाठी सोडत काढण्यात आली.

या ठिकाणी होती घरे
ही घरे पुण्यात महंमदवाडी, धानोरी, पाषाण, बावधन, येवलेवाडी आणि आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी होती. पिंपरी-चिंचवडमधील वाकड, पुनावळे, पिंपळे सौदागर, ताथवडे, किवळे, रहाटणी, पिंपळे निलख, बोऱ्हाडेवाडी, मोशी, चिखली आणि चोवीसवाडी येथील गृहप्रकल्पांमध्ये घरे होती. या घरांसाठी डिसेंबरला सोडत काढण्यात आली होती. आता 4 हजार 700 घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)