पॉवरलिफ्टिंगमध्ये गौरव घुलेला रौप्य पदक

डेडलिफ्टमध्ये सुवर्ण पदक

पुणे – मंगोलिया देशातील उलांबतर या शहरात झालेल्या एपीएफ एशियन क्‍लासिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये गौरव गणेश घुले याने डेडलिफ्टमध्ये सुवर्ण पदक, स्कॉट आणि बेंचप्रेसमध्ये कांस्य पदक मिळवून एकूण स्पर्धेत दुसऱ्या पदाचा मान मिळवत रौप्य पदक पटकावले.

या स्पर्धेमध्ये 702.5 किलो वजन उचलून टिसेंट आयुष या मंगोलियन स्पर्धकाने पहिला क्रमांक पटकावला. 697.5 किलो वजन उचलून गौरव गणेश घुले या भारताच्या स्पर्धकाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर 675 किलो वजन उचलून खुमु गुल या स्पर्धकाने तृतीय क्रमांक मिळवला.

या स्पर्धेमध्ये आशिया मधील सर्व देशांचा सहभाग होता. मंगोलिया देशात 15 अंश सेलि. तापमान असताना सुद्धा गौरव याने उत्तम कामगिरी केली. सलग दुसऱ्या वर्षी रौप्य पदकाचा मान मिळवणाऱ्या गौरव घुले याला गणेश घुले आणि मनीष राजवाडे यांनी प्रशिक्षण दिले आहे. . गौरवबरोबरच भारताच्या दीपा राजेश लुंकड हिने स्पर्ध्येमध्ये कांस्य पदक मिळवले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)