बिट मार्शलने फासावर लटकलेल्या तरुणाचे वाचवले प्राण

पुणे – “मी घरात लटकून घेतो आहे,तू घरीं येई पर्यंत माझे मढे तुला मिळेल”हे वाक्‍य आहे पर्वती दर्शन मध्ये राहणाऱ्या एका तरुणाने दारूच्या नशेत आपल्या बायकोला फोन करून हा निरोप दिला. मात्र पत्नीने तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधल्याने पुढील अनर्थ टळला. दत्तवाडी पोलिस ठाण्यातील दोघा बीट मार्शलनी त्याला फासावर लटकले असताना खाली काढून रुग्णालयात दाखल केले.

यासंदर्भात सविस्तर असे की , 14 मे 2019 रोजी दत्तवाडी पोलीस स्टेशन चे पोलीस कॉन्स्टेबल विष्णू सुतार,अनिल लांडे हे पर्वती दर्शन भागात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बिट मार्शल ड्युटी करत होते.त्या वेळेस त्यांना पोलीस कंट्रोल रूम कडून एक मेसेज मिळाला की,पर्वती दर्शनमध्ये एक तरुण गळफास लावून घेत असल्याचे स्थानिक नागरिकांनी कळविले आहे.आपण ताततडीने तेथे जाऊन त्याला वाचवा.हा संदेश मिळताच बिट मार्शल कर्मचारी यांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन पाहिले .

तेव्हा एका घराचा लोखंडी दरवाजा आतून बंद केलेला होता.त्या घराच्या खिडकीतून पाहिले असता एक तरुणाने घराच्या छताला लाल ओढणीने स्वतःला लटकवून घेतले होते.त्याचे पाय हालताना दिसत होते.त्याला वाचविण्यासाठी विष्णू सुतार,अनिल लांडे या पोलिसांनी लोखंडी दरवाजा तोडला.व त्याला उचलून बाहेर आणले.तो व्यक्ती बेशुद्ध असल्याने त्याला सर्वात प्रथम रिक्षातून हरजिवन हॉस्पिटल व त्या नंतर पूना हॉस्पिटल मध्ये उपचार कामी दाखल केले. यानंतर त्यांच्या नातेवाईकांना कळवुन बोलावून घेतले.सध्या तो तरुण सुस्थितीत आहे त्याच्यावर उपचार चालू आहेत.

ज्या महिलेने पोलिस नियंत्रण कक्ष येथे फोन करून माहिती कळविली होती त्या सौ.रोजमेरी निलेश साळवे राहणार चाळ नंबर / पर्वती दर्शन,पुणे या पोलीस समोर आल्या व त्यांनी सांगितले की,त्यांचे पती निलेश सुरेश साळवे हे अति दारूच्या नशेत घरात असताना त्यांनी”मी घरात लटकवून घेतो आहे,तू घरी येई पर्यंत माझे मढे तुला मिळेल”असा मेसेज मी बाहेर कामानिमित्त गेले असता माझ्या फोन वर पाठवला होता. म्हणून मी त्यांना फोन केला असता त्यांनी हेच वाक्‍य मला सांगितले त्या वेळेस मी अत्यंत घाबरून गेले होते.कारण त्यांचे मानसिक संतुलन ढळले की,त्यांच्या मनात असे स्वतःचे जीवन संपविण्याचा विचार येत असल्याने ते खरच काही विपरीत करून घेतील ह्या चिंते मधून त्यांनी सर्वात प्रथम पोलिस नियंत्रण कक्ष येथे मदती साठी ही माहिती कळवली.

एक तरुण आत्महत्या करतो आहे.त्याचा जीव वाचवला पाहिजे ह्या भावनेतून दत्तवाडी पोलीस स्टेशन चे बिट मार्शल पोलीस कॉन्स्टेबल विष्णू सुतार,अनिल लांडे,यांनी अत्यंत जलद गतीने हालचाली करून पोलीस नियंत्रण कक्ष येथून त्या युवकांचा दिलेला पत्ता शोधून काढून सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण,पोलीस हवालदार अशोक हिरवाळे, नितीन केरीपाळे यांच्या मदतीने काही वेळात सर्व आवश्‍यक कार्यवाही करून निलेश सुरेश साळवे याचा जीव वाचविला. रोजमेरी निलेश साळवे यांनी पोलिसांनी वेळेत पोहचून त्यांच्या पतीला आत्महत्या करण्यापासून वाचवुन त्यांची कार्यतत्परता दाखविली या बद्दल समाधान व्यक्त केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)