मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत पुणे पोलीसांची भाजपला मदत

कॉंग्रेस प्रवक्‍ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई – मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा संबंध भीमा कोरेगाव दंगलीशी जोडून कॉंग्रेस नेत्यांना बदनाम करण्याचा पुणे पोलिसांनी चालवलेला प्रयत्न हा मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठीच असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी येथे केला. भीमा-कोरेगाव दंगलीच्या प्रकरणात पोलिसांनी संशयित म्हणून अटक केलेल्या व्यक्तींच्या चौकशीत कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे नाव पुढे आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. यासंदर्भात प्रितिक्रिया व्यक्त करताना सावंत यांनी पुणे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला.

पुणे पोलिसांची विश्वासार्हता संपली आहे. सर्वोच्च न्यायालयाने भीमा-कोरेगाव दंगलीच्या संदर्भात सुनावणी करताना पुणे पोलीस सातत्याने माध्यमांसमोर का जात आहेत? असा सवाल केला होता. असे असतानाही पुणे पोलीस दलातील अधिकारी माध्यमांशी जाणीवपूर्वक संवाद साधत आहेत. पोलिसांचा या मागचा हेतू भाजपला मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत व्हावे हाच आहे, असे सावंत म्हणाले. राजकीय फायद्यासाठी शहरी नक्षलवाद हा शब्द वापरून कट्टरतावाद्यांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविले जात आहे. महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा गुजरात मॉंडेलनुसार चालवण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. परंतु, गुजरात मॉंडेलची कशी वाताहत झाली हे जनतेसमोर आहे. महाराष्ट्र पोलिसांची तशी अवस्था होऊ नये, अशी अपेक्षा सचिन सावंत यांनी व्यक्त केली.

अस्थानाच्या यांच्या चौकशी दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ढवळाढवळ केल्याचाही आरोप केला आहे. राकेश अस्थाना यांच्या घरी जेव्हा आम्ही झडतीसाठी गेलो होतो तेव्हा आम्हाला अजित डोवाल यांनी घराची झडती घेऊ नका असे बजावल्याचे मनिष कुमार सिन्हा यांनी म्हटले आहे. कोळसा आणि खाण राज्य मंत्री हरिभाई चौधरी यांनी लाचखोरी प्रकरणात राकेश अस्थानांची मदत केल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे. हरिभाई चौधरी हे गुजरातचे खासदार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)