स्कुटरच्या डिकीतून लॉक न उघडता ऐवज चोरणारा गजाआड 

चोरीचे पैसे बचत खात्यात व मुद त ठेवीत 

पुणे : पुणे शहरातील विविध ठिकाणी पार्किंग करण्यात आलेल्या टीव्हीएस ज्युपिटर,सुझुकी ऍक्‍सेस,होंडा ऍक्‍टिव्हा अशा मोपेड दुचाकीच्या डिक्कीत अलगद हात घालून डिक्कीतील पैसे व मौल्यवान वस्तु चोरुणाऱ्या एका सराईतास गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने जेरबंद केले आहे. चोरी करण्यात आलेले पैशांचा चोरटयाने दोन बॅंकेत भरणा केला होता. त्यापैकी एका बॅंकेतून पोलीसांनी चार लाख रुपये जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी दिली आहे. त्याने चोरलेले पैसे फिक्‍स डिपॉझिटमध्ये ठेवल्याची माहितीही प्राथमिक तपासात पुढे आली आहे.

-Ads-

सुभाष ऊर्फ बाबा लक्ष्मण बनपट्टे (वय-40,रा.वडारवाडी,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून एक दुचाकी, चार लाखाची रोकड व एक लॅपटॉप असा चार लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मागील दोन वर्षापासून पुणे शहरात बॅंक, शॉपिंग मॉल मार्केट अशा गर्दीच्या ठिकाणी पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दुचाकी मोपेडच्या डिक्कीतून रोख रक्कम, सोन्याचे दागिने असे मौल्यवान वस्तू चोरीच्या घटना घडत होत्या.

त्याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट चारचे पथक तपास करत असताना, कर्मचारी पोलीस नाईक रमेश चौधर व निलेश शिवतरे यांना माहिती मिळाली की, वडारवाडीतील गुन्हेगार बाबा बनपट्टे याने सुमारे तीन आठवडयापूर्वी नानापेठ येथील एका इमारतीच्या पार्किंग मधून ऍक्‍टीव्हा डिक्की उचकटुन पैसे चोरलेले आहेत. त्यानुसार आरोपीचा शोध घेत असता, मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज वरुन बाबा बनपट्टे या आरोपीस अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने मागील दोन ते तीन वर्षात अशाप्रकारे 30 ते 40 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)