पुणे -‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष मुख्यमंत्री का?

मनसेचा सवाल : पालकमंत्र्यांकडे कार्यभार देण्याची मागणी

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकाणाच्या (पीएमआरडीए) अध्यक्षपदी महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायद्यानुसार (एमआरटीपी अॅक्‍ट) जिल्ह्याचे पालकमंत्री हेच पाहिजेत. असे असताना मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना हटवून हे पद स्वत:कडे ठेवण्याचे कारण काय, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“पीएमआरडीए’च्या विषयावर मनसेने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पक्षाचे प्रवक्ते अनिल शिदोरे, हेमंत संभूस आणि नेते बाबू वागस्कर, रविंद्र गारुडकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संभूस म्हणाले, “एमआरटीपी अॅक्‍टमधील कलम 42 नुसार पीएमआरडीएची स्थापना झाली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार त्यांचे अध्यक्षपद हे पालकमंत्र्यांकडेच असले पाहिजे. तसेच महानगर नियोजन समिती आणि जिल्हा नियोजन समितीच्या मार्गदर्शनानुसार काम प्राधिकरणाने केले पाहिजे. परंतु प्राधिकरण या दोन्ही संस्थांना विश्‍वासात न घेता काम करीत आहे. 80 टक्के भूसंपादन झाल्याशिवाय प्रकल्प हाती घेऊ नये, असा नियम असतानाही प्राधिकरणाने “हायपरलूप’चे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी जागा ताब्यात देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा, अशी भूमिका पक्षाची आहे.

येत्या पंधरा दिवसांत मनसे उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवर मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही मनसेने दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)