पुणे – एलईडी खरेदीस मान्यता

19 कोटी 16 लाख 68 हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव


ईईएसएल कंपनीकडूनच खरेदीचे बंधन

पुणे – शहरातील पथदिव्यांवर 52 हजार फिलिप्स कंपनीच्या एलईडी फिटिंग्ज बसविण्यास स्थायी समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिका प्रशासनाकडून यासाठी 19 कोटी 16 लाख 68 हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. राज्य शासनाने निश्‍चित केलेल्या ईईएसएल कंपनीकडूनच ही खरेदी करणे शासनाने बंधनकारक केले होते. त्यानुसार ही खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

शहरात सुमारे 1 लाख 72 हजार पथदिवे असून, पहिल्या टप्प्यात 75 हजार पथदिव्यांवरील फिटिंग्ज बदलण्याचे काम टाटा कंपनीला देण्यात आले होते. कंपनीसोबत 12 वर्षांसाठी हा करार करताना देखभाल दुरुस्तिची जबाबदारी कंपनीवरच देण्यात आली आहे. परंतु, एलईडी फिटिंग्जच्या कामात घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने उर्वरीत पथदिव्यांवरील फिटिंग्ज बदलण्याचे काम रखडले होते. त्यातच विविध भागांतील नागरिक आणि नगरसेवकांकडून एलईडी फिटिंग्जची मागणी होऊ लागल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी प्रशासनाने एलईडी फिटिंग्ज खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी शासनाने खरेदीसाठी दिलेल्या निर्णयाचा आधार घेऊन 52 हजार पदपथांवरील फिटिंग्ज बदलण्यासंदर्भात निविदा राबविण्यात आली. शासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीतील मे. ईईएसएल कंपनीची निविदा सर्वांत कमी दराची आली असल्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता. त्यानुसार, ही मान्यता देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खरेदीसाठी जुन्या दिव्यांवर खापर
ही खरेदी करताना, महापालिका प्रशासनाकडून 2008 ते 2010 मध्ये खरेदी करण्यात आलेल्या एलईडी दिव्यांवर खापर फोडण्यात आले आहे. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून 2008 ते 2010 मध्ये मोठ्या प्रमाणात पथदिव्यांसाठी क्षेत्रीय कार्यालयांकडून एलईडी दिवे खरेदी करण्यात आले होते. त्यांची वयोमर्यादा 5 ते 6 वर्षांचीच आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पथदिवे बंद असून नगरसेवकांकडून ते बदलण्याची मागणी केली जात असल्याने ही खरेदी करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)