पुणे – मद्यपान करून दुचाकी चालविणाऱ्याला 2 हजारांचा दंड

पुणे – मद्यपान करून बेदरकारपणे दुचाकी चालविणाऱ्याला मोटार वाहन न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. के. खराडे यांनी 2 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. सुनील गोपाळ कऱ्हाडकर (वय 44, रा. वारजे) असे त्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार अरूण भुजबळ यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी भुजबळ हे त्यांच्या सहकाऱ्याबरोबर 14 मार्च 2018 रोजी कुराड चौकात वाहतूक नियमनाचे काम करीत होते. रात्री नऊच्या सुमारास कऱ्हाडकर हा बेदारकारणपे दुचाकी चालवत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी त्याला थांबविले. तोंडास दारूचा वास येत असल्याने कऱ्हाडकरला पोलीस ठाण्यात नेले. त्यावेळी करण्यात आलेल्या ब्रिथ अॅनालायझर चाचणीतून त्याने मद्यपान केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर असून, त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता देखील नाकारता येत नाही, असा युक्तिवाद सहायक सरकारी वकील अनंत चौधरी यांनी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)