पुणे – ‘टीओडी’ धोरणाने “पार्किंग’ची कोंडी

‘ऑन रोड पार्किंग’ न करण्याची धोरणात तरतूद

पुणे – राज्यशासनाने नुकतेच मेट्रो स्थानकाच्या 500 मीटर परिसरात “टीओडी झोन’ अर्थात “ट्रान्झिस्ट ओरिएंटेड डेव्हलपमेंट’ परिसर निश्‍चित केला आहे. यामध्ये रस्त्याच्या रूंदीनुसार, जास्तीत जास्त 4 चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वापरता येणार आहे. मात्र, या धोरणाचा आणखी एक फटका महापालिकेला बसणार असून हे धोरण निश्‍चित करताना संबंधित रस्त्यांच्या परिसरात ऑन रोड पार्किंग (रस्त्यावर वाहने उभी) करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करायची झाल्यास महापालिकेस कर्वे रस्ता, पौड रस्ता, शिवाजीरस्ता, तसेच नगर रस्त्याच्या काही भागातील पार्किंग पूर्णत: बंद करावे लागणार आहे.

राज्य शासनाने 8 मार्च रोजी मेट्रो तसेच सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांचे सक्षमीकरण आणि त्याला निधी उभारण्यासाठी “टीओडी’ धोरणास मान्यता दिली आहे. नागपूरमध्ये मेट्रो मार्गिकांलगत दोन्ही बाजूस 500 मीटरपर्यंतचा परिसर “टीओडी’मध्ये समाविष्ट केला आहे; पण, पुण्यात केवळ स्टेशनलगतच्या 500 मीटर भागावरच “टीओडी’ क्षेत्र निश्‍चित करण्यात आले आहे. मेट्रोच्या दोन स्टेशनमध्ये सरासरी एक किलोमीटरचे अंतर असल्याने सरकारच्या नव्या धोरणानुसार सर्वांना “टीओडी’चे लाभ मिळतील, असे सांगण्यात येत आहे.

असा बसणार फटका
एका बाजूला “टीओडी’ धोरणास मंजुरी मिळाल्याने त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे. असे असले तरी, शहरातील रस्त्यांवरील खासगी वाहनांची संख्या कमी व्हावी या उद्देशाने शहरातील प्रमुख रस्त्यांवर “पे ऍन्ड पार्क’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचे रस्ते अद्याप अंतिम नसले तरी, राज्यशासन या निर्णयासाठी आग्रही आहे. असे असतानाच; “टीओडी’ धोरणामुळे कर्वे रस्ता, पौड रस्ता, जंगली महाराज रस्ता, पालिका भवनाचा परिसर, पुणे स्टेशनचा परिसर, नगर रस्त्याचा परिसर, तसेच शहरातील मध्यवर्ती भागात वर्दळ असलेल्या शिवाजी रस्त्यावर “टीओडी’ धोरणानुसार, “ऑन रोड पे अँन्ड पार्किंग’ न करता संपूर्ण रस्ताच “नो पार्किंग’ करावा लागणार आहे. त्यानंतरही भविष्यात कात्रज, हडपसरपर्यंत तसेच पीएमआरडीए मेट्रो शिवाजी नगर पर्यंत येणार असल्याने या रस्त्यांवरील पार्किंगही कायमचे बंद करावे लागणार असल्याची चिन्हे आहेत.

नवीन जागा विकसित करण्याच्या सूचना
“टीओडी’ धोरणात रस्त्यावरील “ऑन रोड’ सर्व प्रकारचे पार्किंग बंद करण्याची तरतूद असली तरी, त्याच वेळी मेट्रो स्थानके तसेच त्याला जोडणाऱ्या ट्रान्सपोर्टच्या इतर घटकांच्या परिसरात या बंद होणाऱ्या पार्किंगसाठी नवीन पार्किंगच्या जागा विकसित करण्याचेही सुचविण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका आणि महामेट्रोला प्रत्येक स्थानकाच्या परिसरात तसेच ज्या रस्त्यावर ऑन रोड पार्किंग बंद होणार आहे. त्या परिसरात वाहनतळ विकसित क्ररण्याचे बंधनकारक केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)