पुणे – अनुकंपाच्या उमेदवारांना नियुक्‍तीचे आदेश

शिक्षण विभागातील 15 जणांचा प्रलंबित प्रश्‍न सुटल्याने उमेदवारांना मिळाला दिलासा

पुणे – शिक्षण विभागातील 15 अनुकंपाच्या तत्त्वावरील उमेदवारांना कामाच्या नियुक्‍त्यांचे आदेश मिळाले आहेत. अनेक वर्ष रखडलेला प्रश्‍न मार्गी लागल्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

शिक्षण विभागाच्या विविध कार्यालयांतील अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांची पदे अनेक वर्षी भरली नव्हती. यामुळे या कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींसह इतर समस्यांचा सामना करावा लागला. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस अनिल वाघमारे, उपाध्यक्ष सदाशिव निवंगुणे, किसन गटकळ, संजय वाघमारे, नितिन घोडके, शंकर केंगले यांनी अनेकदा मंत्रालयातील शालेय शिक्षण विभाग, सामान्य प्रशासन विभाग, अर्थ व नियोजन विभाग, शिक्षण आयुक्‍त या कार्यालयांतील अधिकाऱ्यांच्या अनुकपांच्या उमेदवारांसह भेटी घेतल्या, निवेदने दिली आणि व्यथाही मांडली. त्याची दखल शासनाकडून घेण्यात आली आहे.

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 15 फेब्रुवारी 2018 ला अनुकंपा तत्त्वावरील पद भरतीबाबतचा आदेश जारी केला होता. त्यानुसार अनुकंपा तत्त्वावरील नियुक्‍तीसाठी प्रति वर्षी रिक्‍त होणाऱ्या पदांच्या 10 टक्‍क्‍यांच्या मर्यादेस 1 मार्च 2017 पासून पुढे 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत 2 वर्षांची मुदतवाढ दिलेली आहे. शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी विशेष लक्ष देऊन जलदगतीने अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांच्या नियुक्‍त्यांचा प्रश्‍न सोडविला आहे.

उमेदवारांचा अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्‍न सोडविल्यामुळे कर्मचारी संघटनेने शिक्षण आयुक्‍तांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला आहे. मंत्री, खासदार, आमदार, वरिष्ठ दर्जाच्या आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांना पदग्रहण करताना संविधानाची शपथ दिली जाते. त्याप्रमाणे शासकीय सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना संविधानाची प्रत देण्याविषयीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस अनिल वाघमारे यांनी केली आहे. शिक्षण आयुक्‍तांच्या हस्ते अनुकंपाच्या तत्त्वावर नियुक्‍ती आदेश मिळालेल्या उमेदवारांना संविधानाची प्रत देण्यात आली आहे.

नियुक्‍ती आदेश मिळालेले उमेदवार…
शीतल गोरे, सचिन कुलथे, साहिल तांबे, विकास केंगले, सचिन शेखरे, बाबासाहेब गायकवाड, आदिती लाड, कुनाल वाघुले, स्मिता शिशुपाल, संकेत मोरे, किशोर गव्हाणे, किरण सोडनर, महेंद्र चव्हाण, मंगेश मोरे, सतिश साळवे, आनंद पवार आदी उमेदवारांना नुकतेच नियुक्‍त्यांचे आदेश मिळाले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)