पुणे – धरणसाखळीत फक्‍त 10.61 टीएमसी पाणी

उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याचे आव्हान

पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव आणि पानशेत या तीन धरणांमध्ये एकूण 10.61 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत 4.32 टीएमसीने कमी आहे. त्यातच शेतीसाठी आर्वतने, शहराला पुढील चार महिने आवश्‍यक पाणी आणि बाष्पीभवन या सर्व बाबी पाहता उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे प्रशासनापुढे आव्हान असणार आहे.

यंदा टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणे 100 टक्के भरली. जुलै ते ऑगस्ट 2018 दरम्यान खडकवासला धरणातून सुमारे 19 टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. मात्र, परतीच्या पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली. धरणात उपलब्ध पाणीसाठा आणि ग्रामीण व शहरी भागात पाण्याची वाढती मागणी यामुळे वाद निर्माण झाले होते. धरणे भरूनही शहराला मिळणाऱ्या पाणीसाठ्यामध्ये कपात करण्याची सूचना पाटबंधारे विभागाने केली आहे. शहराच्या पाण्यात कपात करून ते पाणी शेतीला द्यायचे असल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे.

दरम्यान, दुरुस्तीचे काम सुरू असल्याने टेमघर धरण नोव्हेंबरमध्ये रिकामे करण्यात आले असून आता तीन धरणांतील पाण्यावरच पुढील चार महिन्यांचे नियोजन करावे लागणार आहे.

खडकवासला – 1.32 टीएमसी
पानशेत – 4.69 टीएमसी
वरसगाव – 4.60 टीएमसी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)