पुणे-निजामाबाद रेल्वे दोन महिने रद्द

पुणे – मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड-मनमाड दरम्यान तांत्रिक कामे हाती घेण्यात आली आहेत. दि. 2 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत हे काम पूर्ण केले जाणार आहे. यामुळे या विभागातून पुणे स्टेशनवर येणाऱ्या निजामाबाद एक्‍स्प्रेला अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी पुढील दोन महिने पुणे-निजामाबाद एक्‍स्प्रेस रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सोलापूर विभागात सुरू करण्यात आलेल्या कामाचा फटका पुणे-निजामाबाद एक्‍स्प्रेसला बसला आहे. यामुळे 51421 पुणे-निजामाबाद एक्‍स्प्रेस 2 ऑगस्टपासून बंद राहणार आहे. तर 51422 निजामाबादवरून पुण्याला येणारी निजामाबाद-पुणे एक्‍स्प्रेसही 4 ऑगस्टपासून रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, सलग दोन महिन्यांसाठी या मार्गावरील सेवा बंद राहणार असल्याने प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)