एक्‍सेल व्हेईकल्सची विक्रमी ट्रक विक्री

रोडवे सोल्यूशन्स यांना 20 टिपर्सचे वितरण

पुणे -टाटा मोटर्सचे अधिकृत विक्रेते एक्‍सेल व्हेईकल्स यांनी रोडवे सोल्यूशन्स यांना 20 प्रायमा 25.25 टिपर्सचे वितरण करून ट्रक विक्रीमध्ये एक माईलस्टोन गाठला आहे. वितरणप्रसंगी रोडवे सोल्यूशन्सचे वरिष्ठ अधिकारी जितेंद्र भालेराव, टाटा मोटर्सचे वरिष्ठ अधिकारी पंकज बावीसकर तसेच एक्‍सेल व्हेईकल्स रवी डॉस, कैलास मोरे आणि समीर चावरे उपस्थित होते.

प्रायमा टिपर्स हे टाटा मोटर्सचे दर्जेदार वाहन असून त्याची केबिन एसी व क्रॅश टेस्ट प्रूप आहे. टिपर्स टाटा फ्लीटमॅन या आधुनिक व्हेईकल्स ट्रॅकिंग यंत्रणेने सुसज्ज आहे. ग्राहकांकडून प्रायमा टिपर्संना उत्कृष्ट मायलेज असल्याची मान्यता मिळाली आहे. तसेच ग्राहकांना साईटवरच सर्व्हिसची सुविधा पुरविण्यात येत असल्यामुळे ग्राहकांची उत्पादकता वाढण्यास मदत होत आहे. मजबूत आणि अनेक वैशिष्ट्यामुळे टिपर्सच्या ट्रिपची संख्या वाढून ग्राहकांच्या नफ्यात वाढ होत आहे असेही यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)