संदीप कोद्रे ‘पुणे कॅन्टोन्मेंट बॅंके’चे स्वीकृत संचालक

पुणे – पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाने रिक्‍त असलेल्या संचालक पदाकरिता स्वीकृत संचालकपदी संदीप कैलासराव कोद्रे यांची बिनविरोध निवड केली.

संदीप कोद्रे हे मुंढवा व केशव नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते असून त्यांना सह्याद्री नागरी पतसंस्था पुणेचे अध्यक्ष म्हणून सहकार्य क्षेत्रातील कामाचा अनुभव आहे. या परिसरातील विविध सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे, क्रीडा क्षेत्रात संदीप कोद्रे कार्यरत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बॅंकेचे संचालक ऍड, बाळासाहेब बरके यांच्या आकस्मिक निधनामुळे ही जागा रिक्‍त झाली होती. बरके यांनी आपल्या प्रदीर्घ काळात बॅंकेला केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल संचालक मंडळाने कृतघ्नता व्यक्‍त केली. यावेळी बॅंकेचे अध्यक्ष कैलासमामा कोद्रे, संचालक पोपटराव गायकवाड, उपाध्यक्ष कुंडलिक शिंदे, संचालक मंगल टिळेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)