राजगुरूनगरातील पोलीस वसाहत “लालफितीत’

24 तास कार्यरत असणाऱ्यांच्या कुटुंबाची फरपट थांबणार तरी कधी?


वर्षानुवर्षे इमारातीचा प्रश्‍न शासनदरबारी धुळखात

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राजगुरूनगर- राजगुरुनगर शहरामध्ये खेड तहसीलदार कार्यालयाजवळ ब्रिटीश कालीन पोलीस वसाहत आहे. मात्र, त्याकडे पोलीस विभागाने दुर्लक्ष केल्याने येथे असलेल्या पोलिसांच्या राहण्याच्या खोल्या जीर्ण आणि पडण्यायोग्य झाल्या आहेत. दरम्यान, पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी जवळच असलेल्या अण्णा भाऊ साठेनगर शेजारी नवीन इमारतीसाठी जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र, वर्षानुवर्षे पोलीस ठाणे इमारतीचा प्रश्‍न प्रलंबित आहे. यासाठी शासनदरबारी प्रस्ताव धूळखात पडून असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र तैनात असणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबाची फरपट थांबणार तरी कधी असा सवाल उपस्थित होत आहे.

पोलीस राहत असलेल्या या ब्रिटीशकालीन वसाहतीची जवळपास दहा गुंठे जागा आहे. मात्र, याकडे पोलीस विभागाने वेळीच लक्ष न दिल्याने शहरातील मोक्‍याची जागा पडून आहे. त्याबरोबरच ब्रिटीशांनी बांधलेली इमारत पक्की आहे. मात्र, तिची डागडुजी होत नसल्याने येथे पोलीस राहत नाहीत. पोलिसांना राहण्यासाठी येथे इमारत इमारत बांधली तर त्यांची कायमस्वरूपी सोय होणार आहे. येथील जुन्या पोलीस वसाहती लगत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आहे.

त्यामळे ही जागा वसाहतीसाठी योग्य आहे. ती पडून असल्याचे उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे आणि पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी ही जागा आणि जुन्या खोल्या स्वच्छ केल्या. त्यामध्ये त्या खोल्यांची तात्पुरती दुरुस्ती करून येथे बंदोबस्तासाठी बाहेरगावाहून आलेल्या पोलिसांची राहण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. मात्र, येथे असलेल्या ब्रिटीशकालीन खोल्यांची दुरुस्ती झाली नसल्याने तेथे नवीन इमारत होणे गरजचे असल्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस वसाहत यासाठी खेड पोलिसांकडे अण्णाभाऊ साठे नगर लगत 1 हेक्‍टर 9 आर इतकी प्रशस्त जागा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नावावर आहे. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे येथे प्रशस्त पोलीस ठाणे होण्यास दिरंगाई होत आहे. शहरात खेड तहसीलदार कार्यालयाच्या नजीक जवळपास 10 गुंठ्यामध्ये पोलीस वसाहत कार्यरत आहे. मात्र, येथील ही ब्रिटीशकालीन वसाहत पोलिसांना राहण्यास सुरक्षित नाही. राजगुरुनगर पोलीस ठाणे आणि येथील विभागीय पोलीस कार्यालये सध्या विभक्‍त असल्याने नागरिकांनी त्यांच्या समस्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवता येत नाहीत. त्यासाठी पुन्हा तहसीलदार कचेरीतील कार्यालयात जावे लागते. यामुळे नागरिकांचा वेळ वाया जातो. खेड पोलीस ठाणे आणि पोलीस विभागीय कार्यालय एकत्र असावीत अशी गेली कित्येक वर्षांची नागरिकांची मागणी प्रलंबित आहे.

पोलीस अधीक्षकांनी केली पाहणी

जुन्या पोलीस वसाहतीची आज (शनिवारी) पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पाहणी केली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक निलेश बडाख, पोलीस उपनिरीक्षक संतोष लांडे व पोलीस उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पोलीस उपविभागीय कार्यालयास भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, या जुन्या झालेल्या वसाहतीमधील ब्रिटीश कालीन खोल्यांची दुरुस्ती करून त्या राहण्यायोग्य बनविण्यात येणार असून आगामी काळात येथे पोलिसांसाठी नवी इमारत बांधून राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. गृहविभागाकडे याबाबतचा प्रस्ताव तत्काळ पाठविण्यात येणार आहे.

दंगा काबू पथकाचे वास्तव्य       

या वसाहतीमध्ये खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर परिसरात कार्यरत अवणारे दंगा काबू पथकाचे जवान राहत आहेत. मात्र, येथील जीर्ण इमारत आणि त्यातील गैरसोयीमुळे त्यांना राहणे अवघड होत आहे. जुनी इमारत जीर्ण झाली असली तरी ती भक्कम आहे मात्र, तिच्या खिडक्‍या, छताची कौले फुटली आहेत. बाथरूम, स्वयंपाघर, शौचालय नादुरस्त आहे. सभोवतालचा परिसर स्वच्छ नसल्याने पुरुष जवानांना त्यात राहावे लागत आहे. दंगा काबू पथकातील महिला पोलिसांना वेगळी सोय करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)