पुणे कॅन्टोन्मेंट बॅंकेच्या उपाध्यक्षपदी कुंडलिक शिंदे

पुणे – पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बॅंक पुणेच्या उपाध्यक्षपदी कुंडलिक विष्णू शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. कुंडलिक शिंदे हे वडगाव शिंदे व लोहगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्ते असून भारत फोर्ज कंपनीच्या माध्यमातून कामगार क्षेत्रात
कार्यरत आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहरचे बी. टी. लावंड यांनी काम पाहिले. याप्रसंगी लावंड यांनी बॅंकेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून बंकेच्या संचालक मंडळाने कामकाजात सक्रिय सहभाग घ्यावा व व्यवसायवाढ करत असतांना वसुलीकडे वेळच्यावेळी लक्ष द्यावे तसेच सहकारी बॅंका चालविताना संचालकांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून पारदर्शक व्यवहार करून एक विश्‍वस्त म्हणून कामकाज करावे असे मार्गदर्शन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सहकार विभागाकडून बॅंकेस कामकाजाबाबत सकारात्मक सहकार्य मिळेल, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी बॅंकेचे संस्थापक संचालक विद्यमान अध्यक्ष कैलासमामा कोद्रे यांनी नूतन उपाध्यक्षांचे अभिनंदन केले तसेच निवणूक निर्णय अधिकारी यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले.

याप्रसंगी बॅंकेचे संचालक, कैलासभाऊ कोद्रे, मंगल टिळेकर, पोपटराव गायकवाड, नितीन मोझे, रमेश कोद्रे, ऍड. अविनाश कवडे, देविदास भाट, स्मिता लडकत, सुरेश भालेराव, नंदकिशोर बिडकर, संजय फटके, सुनील मोझे, संतोष पेठे (सी.ए.), ऍड. दिलीप जगताप, सेवक प्रतिनिधी अरुण जवळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश पाटील, सरव्यवस्थापक विजय कोद्रे व सेवक वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)