सर्वसामान्यांच्या भाषेत जाहिरातीची कॉपी असावी-सोलापूरकर

द ऍक्‍टिव्ह ग्रुप तर्फे 15 वा वार्षिक टॅग पारितोषिक वितरण

पुणे – द ऍक्‍टिव्ह ग्रुप (टॅग) तर्फे जाहिरात क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी दिला जाणारा 15 वा वार्षिक टॅग पारितोषिक वितरण समारंभ अभिनेते राहुल सोलापूरकर, निवेदक सुधीर गाडगीळ आणि ऍड.महेश गजेंद्रगडकर यांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धेसाठी पुणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर व नागपूरमधून अधिक प्रवेशिका आल्या होत्या.

यावेळी देण्यात आलेले पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत. प्रेस कॅम्पेन इंग्रजी (द अनकॉमन्स डिझाईन – कांस्य), प्रेस कॅम्पेन कोणतीही भारतीय भाषा (सुरेखा कम्युनिकेशन आणि रिवेल क्रिएशन – कांस्य) सिंगल प्रेस ऍडव्हर्टायझमेंट – इंग्रजी (थ्री डॉटस डिझाईन आणि होरीझॉन ऍडव्हर्टायझिंग -कांस्य), प्रेस ऍडव्हर्टायझमेंट (जी अँड जी मीडिया-कांस्य), सिंगल प्रेस ऍडव्हर्टायझमेंट- कोणतीही भारतीय भाषा (थ्री डॉटस डिझाईन आणि सुरेखा कम्युनिकेशन – कांस्य), अपॉईंटमेंट ऍडव्हर्टायझमेंट (साकेत कम्युनिकेशन-कांस्य),कॉपीरायटिंग – इंग्रजी आणि मराठी (निर्मिती ऍडव्हर्टायझिंग, नाशिक – कांस्य) (थ्री डॉटस डिझाईन – रौप्य), डायरेक्‍ट मेल (क्‍लासिक पब्लिसिटी, नगर आणि जी अँड जी मीडिया-कांस्य) ग्रीटिंग कार्डस (सुभाष जमदाडे आणि प्रकाश ऑफसेट -कांस्य) आऊटडोअर (थ्री डॉटस डिझाईन-रौप्य) आणि (रिवेल क्रिएशन -कांस्य), पॉईंट ऑफ पर्चेस (जेनेसिस ऍडव्हर्टायझिंग-कांस्य), पॅकेजिंग (द अनकॉमन्स डिझाईन -कांस्य), प्रिंटेड इल्युस्ट्रेशन (थ्री डॉटस डिझाईन – कांस्य), बुक जॅकेट (मोना ऍडव्हर्टायझिंग – रौप्य) आणि (रूपा देवधर – कांस्य), फोटोग्राफी (जेनेसिस ऍडव्हर्टायझिंग – कांस्य), कॉर्पोरेट आयडेंटिटी (रिवेल क्रिएशनआणि थ्री डॉटस डिझाईन – कांस्य), कॅलेंडर डिझाईन (साकेत कम्युनिकेशन – रौप्य आणि रिवेल क्रिएशन -कांस्य), एडिटोरिअल आर्ट (थ्री डॉटस डिझाईन – कांस्य), टायपोग्राफी (थ्री डॉटस डिझाईन आणि रिवेल क्रिएशन प्रा.लि. – कांस्य) रेडिओ (थ्री डॉटस डिझाईन -रौप्य आणि जिंगल सन रेडिओ ऍडव्हर्टायझमेंट- कांस्य) बेस्ट फोटोग्राफी कॅम्पेन (जी अँड जी मीडिया -कांस्य), इल्युस्ट्रेटर ऑफ द इयर (द अनकॉमन्स डिझाईन-कांस्य),अनपब्लिश्‍ड मटेरियल (योगेश श्रीधर येलवे आणि कला कल्पना, कोल्हापूर-कांस्य) सोशल मटेरियल (सुरेखा कम्युनिकेशन व क्‍लासिक पब्लिसिटी -कांस्य) अशा अनेक विभागांतील पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

राहुल सोलापूरकर म्हणाले की, जाहिरातीची कॉपी जनसामान्याच्या भाषेतील असावी. सुधीर गाडगीळ म्हणाले की, सूत्रसंचालनाप्रमाणेच कॉपीसुद्धा नेमकी कमीत कमी शब्दांत संपूर्ण आशय व्यक्‍त करणारी असावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश रांगणेकर आणि आभारप्रदर्शन ऍड. महेश गजेंद्रगडकर यांनी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here