पुणे नाशिक महामार्गावर शिवशाहीचे चाक निखळले

संगमनेर – तालुक्‍यातील घारगाव शिवारात पुणे – नाशिक महामार्गावर नाशिक आगाराच्या शिवशाही बसचे चाक अचानक निखळल्याची घटना आज सकाळी 7 वाजता घडली. चालक बाबा बच्छाव यांच्या प्रसंगावधानामुळे बसमधील चौदा प्रवाशांच्या जिव वाचला.

नाशिक आगाराची शिवशाही बस ( एम. एच 09, ईएम 1291) पुण्याहून नाशिककडे प्रवाशी घेऊन जात होती. नाशिक-पुणे महामार्गावर घारगाव पुलावर उताराला बसचे चाक अचानक निखळले. हे चाक 500 मीटर दूरवर जाऊन पडले. चालकाच्या लक्षात येताच त्याने तात्काळ बस थांबवली आणि बसमधील प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. या बसमध्ये चौदा प्रवाशी होते. त्या सर्वांना इतर वाहनातुन मार्गस्थ करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)