पुणे – अग्निशमन दलासाठी भरतीचा ‘नागपूर पॅटर्न’

सेवा प्रवेश नियमावलीसाठी महापालिकेचे शासनाला पत्र

पुणे – महापालिकेच्या अग्निशमन दलात तब्बल 50 टक्के जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी महापालिकेने राज्य शासनाकडे अग्निशनम दलाची सेवा प्रवेश नियमावली मान्यतेसाठी पाठविली आहे. मात्र, त्यास मंजुरी मिळत नसल्याने तोपर्यंत नागपूर महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमवलीतील तरतुदींची अंमलबजावणी करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

महापालिकेची शहरात 14 अग्निशमन केंद्र आहेत. तर, लोकसंखेच्या निकषानुसार ही केंद्र 30 हून अधिक असणे आवश्‍यक आहे. त्यातच या विभागासाठी एकूण 944 कर्मचारी आवश्‍यक असून प्रत्यक्षात पालिकेत 440 कर्मचारीच कार्यरत आहेत. कर्मचारी भरतीसाठी महापालिकेने शैक्षणिक पात्रता तसेच सेवा प्रवेश नियमावली करून शासनाच्या मान्यतेसाठी पाठविली आहे. त्यामुळे ही मान्यते मिळेपर्यंत नवीन कर्मचारी भरती करता येत नसल्याने कामाचा ताण वाढतच आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने या विभागातील सध्याच्या कर्मचाऱ्यांची बढती तसेच नवीन पदभरतीसाठी शासनाकडून नियमावलीस मान्यता मिळेपर्यंत नागपूर महापालिका अग्निशमन दलाच्या सेवा प्रवेश नियमावलीची अंमलबजाणी करण्याची मुभा मिळावी, अशी मागणी सामान्य प्रशासन विभागाने नगरविकास विभागाकडे मागील महिन्यात पत्राद्वारे केली आहे.

पुणे आणि नागपूर या “अ’ दर्जा असलेल्या समकक्ष महापालिका आहेत. या बाबींचा विचार करून याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)