पुणे महापालिकाच देणार कचऱ्यासाठी पर्याय

प्रक्रिया प्रकल्पासाठी मोठ्या सोसायट्यांना करणार मदत

पुणे – महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील विविध उपाय-योजनांच्या अंतर्गत घरे, सोसायट्या, शाळा, हॉटेल्स तसेच विविध संस्था, कंपन्यांच्या हद्दीतच ओला कचरा कसा जिरविला जावा, यासाठी महापालिकेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्या अंतर्गत अशा प्रकारचे प्रकल्प उभारणाऱ्या सोसायट्या व्यक्ती तसेच संस्थाच्या माहितीची सूची घनकचरा व्यवस्थापन विभाग तयार करणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ओला कचरा हद्दीतच जिरविण्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याचा महानगरपालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. घनकचरा व्यवस्थापन नियमावली-2016 च्या अनुषंगाने “बल्क वेस्ट जनरेटर’ म्हणजेच 100 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या, संस्था, हॉटेल्स यांनी ओला कचरा स्वत:च्या हद्दीतच जिरविणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकदा या सोसायट्या अथवा संस्थांना हे काम करण्यासाठी मार्गदर्शन तसेच आपल्या गरजेनुसार, नेमकी कशा प्रकारची यंत्रणा याची माहिती नसते. त्यामुळे या कचरा व्यवस्थापनाकडे सोसायट्या दुर्लक्ष करतात. ही बाब लक्षात घेऊन 1 किलो ते 1 हजार किलोदरम्यान ओला कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या सोसायट्या, व्यक्ती, संस्था, कंपन्यांची सूची करण्याचे काम घनकचरा व्यवस्थापन विभागाने हाती घेतले आहे. त्या अंतर्गत महापालिकेकडे आतापर्यंत 25 जणांनी नोंदणी केले आहे. अशा संस्था अथवा व्यक्‍तींनी घनकचरा व्यवस्थापन विभागाशी 2 मार्चपूर्वी संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांनी केले आहे.

माहितीचे प्रदर्शन भरविणार
ही सूची तयार केल्यानंतर प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर महापालिकेकडून प्रदर्शन भरविले जाणार आहे. या प्रदर्शनात हे प्रकल्प करणारे आणि ज्या सोसायट्या-संस्थांना कचरा व्यवस्थापनाची माहिती हवी आहे, अशा व्यक्तींनाही निमंत्रित केले जाणार असून त्यांच्या माध्यमातून नागरिकांना माहिती दिली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)