बंडगार्डन परिसराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद

पुणे – महापालिकेच्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत गुरूवार (दि. 2) आणि शुक्रवार (दि. 3) रोजी दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने या विभागांतर्गत येणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा या दोन दिवशी बंद राहणार असल्याचे महापालिकेतर्फे कळवण्यात आले आहे.

येरवडा येथे पर्णकुटी पोलीस चौकी समोरील एक हजार मि.मी. व्यासाची रायझिंग मेन लाइनचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. पाणीपुरवठा बंद राहणारा भाग – प्रभाग क्र. 2 चा संपूर्ण भाग, शांतीनगर, फुलेनगर, सैनिकवाडी, कस्तुरबा सोसायटी, प्रतीकनगर, बॉम्बेसॅपर्स, आंबेडकर कॉलनी, हरिगंगा सोसायटी परिसर, मेंटल कॉर्नर, राम सोसायटी, भारतनगर, इंदिरानगर, साप्रस, प्रभाग क्र. 6, संपूर्ण येरवडा गावठाण, संगमवाडी, यू.पी. हॉटेल परिसर, अशोकनगर, गणेशनगर, सुभाषनगर, नेताजी हायस्कूल परिसर, कामराजनगर, लक्ष्मीनगर, रामनगर, जयजवाननगर, हॉटमिक्‍स प्लान्ट, आंबेडकर कॉलेज परिसर, प्रभाग क्र. 5 मधील सैनिकवाडी, वृंदावननगर, कल्याणीनगर, खराडकर नगर, साईकृपा, महावीरनगर, विठ्ठलनगर, मुनुरवार सोसायटी, वडगावशेरी गावठाण आदी परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)