नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या नाराजीवर खांदेपालटीचा उतारा

कार्यक्षमेतेनुसार खातेवाटप : प्रशासनात मोठ्या बदलांची शक्‍यता

पुणे – महापालिका प्रशासनाच्या कारभाराची घडी बसविण्यासाठी विभाग प्रमुखांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या जाण्याची शक्‍यता आहे. महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांकडे अनावश्‍यकपणे जादा पदभार असल्याने तसेच काही अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याने हे बदल होणार आहेत. दरम्यान, प्रत्येक अधिकाऱ्याची कार्यक्षमता आणि त्यांच्या कामाची पद्धत हे पाहून त्यांच्या खात्यांमध्ये बदल केले जाणार आहेत.

-Ads-

याबाबत महापालिका आयुक्त सौरभ राव आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्यात शुक्रवारी चर्चा झाली असून या बदलांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. महापालिकेत सव्वा वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या भाजपला पालिका प्रशासन जुमानत नाही, प्रशासनावर भाजपची पकड नसल्याची टीका वारंवार होत आहे. तसेच भाजप नगरसेवकांकडूनच आपली कामे मार्गी लागत नसल्याच्या तक्रारी महापालिकेच्या मुख्यसभेसह पक्षाच्या बैठकांमध्येही वारंवार केली जात आहे. त्यामुळे भविष्यात भाजपाला अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेऊन आता आपली कामे मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांच्या खात्यांमध्ये बदल करण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दहा ते बारा खात्यांचे प्रमुख बदलले जाण्याची शक्‍यता आहे. कामाचा अनुभव, निर्णय प्रक्रिया आणि त्याचा संभाव्य परिणाम या बाबी जाणून अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी काही कालावधी लागणार आहे. आयुक्त राव आणि भिमाले यांच्या झालेल्या बैठकीत प्रत्येक विभागाचा आढावा घेण्यात आला, त्यात अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमेतेची चर्चाही करण्यात आली आहे. त्यानुसार, हे फेरबदल केले जाणार आहेत.

शहर विकासासाठी प्रशासकीय कारभार गतिमान होण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. अनेक अधिकाऱ्यांबाबत वारंवार तक्रारी आहेत. तर अधिकारी असतानाही काही ठराविक अधिकाऱ्यांकडे मोठया प्रमाणात खाती देण्यात आली आहे. त्याबाबत आयुक्तांशी शुक्रवारी चर्चा केली आहे. मात्र, अंतिम प्रशासकीय निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा आहे. त्यानुसार, ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.
– श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते, मनपा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)