मुलांमध्ये क्रीडा संस्कृती जोपासण्याची गरज 

पालिका शाळांमधील मुलांसाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन

पुणे : घराघरांमध्ये मुले मोबाईल आणि डीजीटल गेमच्या जाळयात ओढली जात असतानाच; मुलांमध्ये क्रीडा संस्कृती रूजविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी मुलांमध्ये खेळांची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने घेण्यात येणारे लहान मोठे क्रीडा महोत्सव महत्वाची भूमिका ठरवू शकतात. असे मत महापालिकेच्या महापालिकेच्या कोरेगाव पार्क मधील मनपा शाळा 39 बी कस्तुबा गांधी शाळेचे मुख्याध्यापक चांगदेव बिचकुले यांनी व्यक्त केले. आयडेंडीटी फाऊंडेशनच्या वतीने महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तसेच शहरातील वेगवेगळया वस्त्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात मैदानांची संख्या दिवसें दिवस कमी होत आहे. त्यामुळे मुलांमध्ये मैदानांवर जावून खेळण्याची प्रवृत्ती कमी होत असून मुले मोबाईल, टीव्ही तसेच डीजीटल गेम्सच्या आहारी जात आहेत. ही बाब लक्षात घेऊन मुलांमध्ये क्रीडा संस्कृती वाढीस लागावी या उद्देशाने शाळेच्या मैदानावर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक बिचकुले यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी मुलांसाठी पळणे, लंगडी या खेळासह इतर करमणूकीच्या मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विजेती मुले तसेच सहभागी मुलांना संस्थेच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली. आयडेंटीटी फाऊंडेशनचे विश्‍वस्त सचिन कुलकर्णी, विश्‍वस्त आणि प्रकल्प अधिकारी संगीता शिंदे, संस्थेच्या शिक्षिका निशा शिंदे, नीता भांडवलकर, योगीता पगारे, सविता गोंधळे, सुनीता कांबळे, कविता शेंडगे, शितल भोसले यांच्यासह विष्णू सोनावणे आणि राजेंद्र कोळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)