संत रोहिदास महाराज जयंतीचा पालिकेला विसर

संबंधित अधिकाऱ्याला निलंबीत करण्याची मागणी

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात’ कार्यक्रमात मागील महिन्यात संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्याविषयी बोलण्यास वीस मिनिटे वेळ दिला. त्यांच्याच पक्षाच्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीचा विसर पडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात येणार असल्याचे शहर संत रोहीदास चर्मकार संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

संत रोहिदास महाराज यांची मंगळवारी जयंती होती. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने काहीच तयारी केली नसल्याचे संत रोहिदास चर्मकार संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजले. या घटनेचा निषेध करण्यासाठी संघटनेच्या वतीने महापालिकेच्या पायऱ्यांवर आणि संत रोहिदास महाराज यांच्या तैलचित्रासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सत्ताधाऱ्यांवर जातीयवादाचा आरोप करण्यात आला. या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिकेत येऊन संत रोहिदास महाराज यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करूण अभिवादन केले.

यावेळी बोलताना महापौरांनी दिलगीरी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर दोन दिवसांत योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही आंदोलकांना दिली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी महापालिकेचे आयुक्त आणि महापौरांवर जात प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी अविनाश पोटे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)