नागरिकांनो, तुम्हीही सूचवा पालिका अंदाजपत्रकात कामे

5 लाखांपर्यंत काम सूचविण्याची मर्यादा : प्रत्येक प्रभागासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद

पुणे – महापालिका प्रशासनाकडून 2019-20 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाचे काम सुरू करण्यात आले आहे. यात दरवर्षीप्रमाणे यंदाही “सहभागी अंदाजपत्रक’ संकल्पना राबविण्यात येणार आहे.

-Ads-

यंदाही आता प्रत्येक नागरिकाला आपल्या वॉर्डमध्ये आवश्‍यक असलेली कामे सूचविता येणार आहेत. प्रशासनाकडून या योजनेसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या तरतुदीनुसार, प्रत्येक प्रभागासाठी 1 कोटी रुपयांपर्यंतची कामे सुचविता येणार असून प्रभागांमध्ये असलेल्या 4 वॉर्डांमध्ये प्रत्येकी 25 लाखांची ही तरतूद असणार आहे. तर एका वॉर्डसाठी जास्तीत जास्त 5 लाखांची 5 कामे मंजूर केली जाणार आहेत. ही कामे सूचविण्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून नागरिकांना 7 सप्टेंबरपर्यंत हे अर्ज द्यायचे आहेत.

अशी असते प्रक्रिया
सहभागी अंदाजपत्रकासाठी महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालय स्तरावर 6 ऑगस्ट 2018 पासून अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे अर्ज नागरिकांनी विकासकाम सूचवून 7 सप्टेंबर 2018 पर्यंत क्षेत्रीय कार्यालयात जमा करायची आहेत. त्यानंतर क्षेत्रीय कार्यालय स्तरावर प्रभाग समितीच्या बैठकीत आलेल्या कामांमधून जी कामे घेणे शक्‍य आहेत. त्यातील 5 कामे निवडली जातील. या कामांची यादी नंतर क्षेत्रीय कार्यालयाकडून 8 ऑक्‍टेबरपर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)