संप कराल, तर शिस्तभंगाची कारवाई

शिक्षकांचाही संप : महापालिका शाळा सुरूच राहणार

पुणे – प्रलंबित मागण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचे काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामध्ये महापालिका शाळेतील शिक्षकांनीही सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून 8 आणि 9 ऑगस्ट रोजी कामबंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने संघटनेच्या या भूमिकेस विरोध केला आहे.

-Ads-

जे शिक्षक या काम बंद आंदोलनात सहभागी होतील, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा महापालिकेचे शिक्षण प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी दिला आहे. महापालिकेच्या सुमारे 287 शाळा असून त्यामध्ये 94 हजार प्राथमिक, तर 12 हजार मुले माध्यमिक विभागात शिक्षण घेतात. या शाळांसाठी सुमारे 1,700 शिक्षक कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना आणि महाराष्ट्र राज्य पदवीधर संघटनाच्या सदस्यांनी मंगळवारी सायंकाळी या संपात शिक्षक सहभागी होणार असल्याचे पत्र प्रशासनास दिले आहेत. त्यामुळे शिक्षक संपावर गेल्यास शाळेवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. तसेच काही शाळांमधील शिक्षकांनी मुलांना संप असल्याने शाळेत न येण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याने महापालिकेने हा खुलासा केला आहे.

शिक्षकांचा हा संप अचानक पुकारण्यात आला आहे. याचे पत्र मंगळवारी देण्यात आले. मात्र, त्यामुळे कोणत्याही शाळा बंद ठेवल्या जाणार नाहीत. संपात सगळे शिक्षक सहभागी होणार नाहीत, असे चित्र आहे. शिक्षक नाहीत, तिथे पर्यवेक्षक, सहायक शिक्षण प्रमुख आणि वेळप्रसंगी उपशिक्षण प्रमुख वर्ग घेतील, याचे नियोजन करण्यात आले आहे.
– शिवाजी दौंडकर, शिक्षण विभागप्रमुख.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)