मेट्रोची धाव वारजे-शिवणे-उत्तमनगरपर्यंत

प्रस्तावास स्थायी समितीची मान्यता : अहवाल लवकरच

पुणे – पौडफाटा उड्डाणपूलावरून थेट शिवणेपर्यंत आता मेट्रो धावणार असून, स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत त्यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

-Ads-

कोथरूड गाव, कर्वेनगर, वारजे, डहाणूकर कॉलनी, नवसह्याद्री, हिंगणे, हॅपी कॉलनी, वारजे जकातनाका परिसर, कमिन्स कॉलेज परिसर हा सध्या मोठ्या लोकसंख्येचा भाग झाला आहे. तसेच या परिसराला आता शिवणे, उत्तमनगर ही गावेही जोडण्यात आली आहेत. त्यामुळे या भागात होणारे औद्योगिकीकरण, माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा विस्तार आणि वाढते नागरिकरण लक्षात घेता मेट्रो शिवणेपर्यंत धावावी, असा प्रस्ताव स्थायी समोर ठेवण्यात आला होता. त्याला स्थायीने मंगळवारी मंजुरी दिली. मेट्रोच्या या विस्तारित प्रकल्पासाठी अहवाल तयार करण्याला “महामेट्रो’ला सांगण्यात येणार आहे. त्यामुळे त्यानुसार येथील कामालाही लवकरच सुरूवात होईल.

पौड फाटा उड्डाणपूल परिसरात कोथरुड गावठाण, कर्वे रस्ता, एनडीए रस्ता तसेच सातारा रस्त्याकडून येणारी वाहने एकत्र होऊन सदर वाहतूक वारजे-शिवणेकडे जात असल्याने पौड उड्डाणपूल ते वारजे-शिवणे या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे पौड उड्डाणपूल ते वारजे-शिवणे या रस्त्यावर पौड उड्डाणपुलापासून शिवणेपर्यंत मेट्रो मार्गिका विस्तारीत करण्याचा निर्णय घेतल्याने या रस्त्यावरील होणारी वाहतुकीची कोंडी कमी होऊन नागरिकांना आरामदायी आणि सुरक्षित अशी सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होऊ शकेल. यासाठी येणारा खर्च आणि अन्य बाबी महामेट्रोला सांगण्यात येणाऱ्या अहवालातून स्पष्ट होणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)