विकासकामांचा आढावा सादर करा

स्थायी समितीचे प्रशासनाला आदेश

पुणे – महापालिकेचे 2018-19 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सुरू होऊन 4 महिने झाले, तरी प्रस्तावित कामे अजून सुरू झालेली नाहीत. तसेच स्थायी समितीने मंजुरी दिलेली अनेक कामेही रखडली आहेत. त्यामुळे नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यामध्ये नाराजीचा सूर असून स्थायी समितीनेही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाचा स्वतंत्र अहवाल समितीत ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती स्थायी समितीने दिली आहे.

-Ads-

1 एप्रिल 2018 पासून पालिकेचे नवीन अंदाजपत्रक सुरू झाले, तरीही ऑगस्ट सुरू होऊनदेखील अजून “डीएसआर’ अंतिम करून निविदांसाठीच्या तांत्रिक बाबी पूर्ण करणे सुरू आहे. त्यामुळे अंदाजपत्रकात प्रस्तावित कोणत्याच योजना मान्यतेसाठी येत नसल्याचे चित्र आहे. त्यातच पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्याने त्याची आचारसंहिता डिसेंबर-2018 च्या सुमारास लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपला जास्तीत जास्त विषय मार्गी लावायचे झाल्यास डिसेंबर-2018 पूर्वीच मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावावी लागणार आहेत. त्यामुळे स्थायी समितीच्या हातात अवघे पाच महिनेच आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थायी समितीकडून विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे.

5 ते 25 लाखांचा अहवालही येणार
अतिरिक्त आयुक्त आणि क्षेत्रीय कार्यालय स्तरावर 5 ते 25 लाखांपर्यंत केलेल्या विकासकामांचा अहवालही स्थायी समितीसमोर सादर केला जाणार आहे. त्याबाबतचे कार्यालयीन आदेश सर्व विभाग प्रमुखांना पाठविण्यात आले आहेत. तसेच हे अहवाल प्रत्येक महिन्याला तयार करण्याच्या सूचनाही विभाग प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. या कामाच्या निविदा स्थायी समितीच्या मान्यतेसाठी येत नाहीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)