आता पालिकेतच दारूपार्ट्या!

सुरक्षा रक्षक कार्यालयाबाबत प्रश्‍नचिन्ह

पुणे – महापालिका मुख्य इमारत पार्किंग तसेच आडोशाला रंगणाऱ्या दारूपार्ट्यांचे पेव आता थेट मुख्य इमारतींमध्येच पोहचले आहे. तळ मजल्यावर सुरक्षा विभाग कार्यालयासमोरील स्वच्छतागृहात दारू बाटल्यांचा खच आढळून आला आहे. त्यामुळे महापालिकेत रात्री ऐवढी सुरक्षा असतानाही दारूपार्ट्या चालत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

-Ads-

काही महिन्यांपूर्वी मुख्य इमारतीच्या समोरील पार्किंगमध्ये दारूच्या बाटल्यांचा खच आढळला होता. तर, काही दिवसांपूर्वी पालिकेच्या याच पार्किंगमधील तळमजल्याखालील ड्रेनेजमध्ये दारूच्या बाटल्या तसेच प्लॅस्टिकचे ग्लासचा खच भरून गेल्याने; या ड्रेनेज तुंबल्या. तसेच काही वाहनचालकही दारू पिताना आढळले होते. त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने रात्री इमारत सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवली होती. त्यानंतर हे प्रकार थांबले होते. मात्र, मंगळवारी सकाळी स्वच्छतेसाठी काही कर्मचारी गेले असता, त्यांना स्वच्छतागृहाची खिडकी तसेच आतील बाजूस पुन्हा दारूच्या बाटल्यांचा खच सापडला. त्यामुळे मुख्य इमारतीत अशा पार्ट्या झडत असतानाही सुरक्षा व्यवस्था आहे कोठे? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

सुरक्षेवर विश्‍वास कसा ठेवायचा?
महापालिकेच्या मुख्य इमारतीत सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तसेच या मंगळवारी आढळलेल्या या बाटल्या चक्क सुरक्षा विभागाच्या मुख्य केबिनपासून अवघ्या 15 फुटांवरील स्वच्छतागृहात सापडल्या. त्यामुळे एकतर हे मद्यपी दिवसा दारू पितात, अथवा रात्री पिऊन त्या बाटल्या स्वच्छतागृहात लपवितात. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था नक्की आहे का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तसेच दारूपार्ट्यांमध्ये सुरक्षारक्षक सहभागी होत असतील, तर या व्यवस्थेवर विश्‍वास कसा ठेवायचा, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पालिकेतच मद्यप्राशनाचे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. अनेकदा मद्यपी खिशात बाटल्या घेऊन येतात, नंतर त्या स्वच्छतागृहात टाकतात. हे प्रकार रोखण्यासाठी नेमक्‍या काय उपाय योजना करता येतील, हे लवकरच निश्‍चित करून हे प्रकार थांबविले जातील.
– माधव जगताप, प्रभारी सुरक्षा विभागप्रमुख.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)