पुणे – मुळा-मुठा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू

पुणे – मुळा-मुठा नदीवरील मुंढवा परिसरातील जुना पूल धोकादायक झाल्याचे सर्वेक्षण झाल्यानंतर पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. पुलाच्या दुरूस्ती पूर्ण होईपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मुंढवा येथील मुळा-मुठा नदीवरील जुना पूल चाळीस वर्ष जुना आहे. या पुलाचे काही दिवसांपूर्वी तज्ज्ञांकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. तेव्हा पूल धोकादायक झाल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले होते. या पुलाच्या दुरूस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी केले आहे.

पर्यायी मार्गाचा अवलंब करा
जुन्या पुलाची दुरुस्ती होईपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्ग म्हणून नवीन पुलाचा वापर करावा. मुंढवा खराडी बाह्यवळण रस्त्यावरील अवजड वाहतुकीबाबत दिलेल्या आदेशात अंशत: बदल करण्यात आले असून अवजड वाहनांना सकाळी 6 ते रात्री 11 यावेळेत बाह्यवळण मार्ग वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)