पुणे – निवडणूक काळात पैशांच्या गैरव्यवहारांवर करडी नजर

गैरप्रकार आढळल्यास तातडीने संपर्क साधा : आयकर विभाग


स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना

पुणे – निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी राजकारणी आणि कार्यकर्ते यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरवापर होतो. अनेकदा हा पैसा काळा पैशांच्या स्वरूपात असतो. पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार आयकर विभागाकडून स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अशा प्रकारचा गैरवापर आढळल्यास नागरिकांनी त्वरित या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयकर विभागाकडून करण्यात आले आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना प्रभावित करण्यासाठी राजकीय नेते, पक्ष यांच्याकडून विविध मार्गांनी पैशाचा गैरवापर करण्यात आल्याच्या नोंदी निवडणूक आयोगाकडे आहे. आगामी लोकसभा निवडणूक ही योग्य मार्गाने लढली जावी, यासाठी पैशांचा गैरवापर रोखणे आवश्‍यक आहे. यासाठीच निवडणूक आयोगाने आयकर विभागाला यासंदर्भात लक्ष देण्याची मागणी केली आहे. या मागणीची दखल घेत, आयकर विभागाकडून जिल्ह्यात आठवड्याच्या सर्व दिवशी 24 तास कार्यरत असणारे स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

टोल फ्री क्रमांक
पैशांच्या गैरवापराबाबत माहिती देण्यासाठी 1800-233-0700 आणि 1800-233-0701 या टोल फ्री क्रमांकावर तसेच 7498977898 या व्हॉट्‌स ऍप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयकर विभागातर्फे करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)