पुणे – मिसळपाव सेंटर्स, हॉटेलांमध्ये सवलत

हॉटेल, आईस्क्रिम पार्लर फुल्ल तेजीत

पुणे – मतदान केल्यानंतर बोटावरील खूण दाखवली तर मिसळपाव सेंटर्स आणि हॉटेलांमध्ये पदार्थांमध्ये सवलत देण्याचा फंडा काही हॉटेलचालकांनी चालवला. हा प्रकार प्रसिद्धीसाठी असला, तरीही त्यांनी तो “कॅश’ करण्याचा प्रयत्न केला आहे.

क्रिकेट वर्ल्ड कप, महापालिका निवडणुकांमध्ये या व्यावसायिकांनी हा फंडा वापरला होता. तोच आता लोकसभा निवडणुकांवेळीही वापरला आहे. सर्व सरकारी, खासगी आस्थापनांना मतदानानिमित्त सुट्टीच दिल्यामुळे मतदान केल्यानंतर अनेकांनी सुट्टीचा मूड एन्जॉय केला. मतदान “कम्पल्सरी’ असल्यामुळे आणि “आऊट ऑफ स्टेशन’ जाणे शक्‍य नसल्याने आणि शहरात राहणे क्रमप्राप्त होते. मतदानाच्या रांगेत उभे राहिल्यानंतर अनेकांनी सहकुटुंब मोर्चा हॉटेलांमध्ये वळवला. त्यामुळेच ऐन दुपारी हॉटेलांमध्ये “ओव्हरफ्लो’ गर्दी झाली.

हीच परिस्थिती कॉफी शॉप्स, आईस्क्रिम पार्लरमध्ये होती. तापमान खूप असल्यामुळे थंडावा मिळण्यासाठी पुण्यातील फेमस आईस्क्रिम पार्लरमध्येही अनेकांनी गर्दी केली. वीकएन्डना जसे वातावरण शहरात असते तसेच वातावरण शहरात मतदानाच्या दिवशी अनुभवायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)