पुणे – परजिल्ह्यातील स्थलांतरीतांनाही मिळणार “रेशन’

पुणे – राज्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या गावांतील पात्र व्यक्तींना रेशन दुकानांमधून धान्य वितरीत करण्यात येते. दुष्काळग्रस्त नागरिक दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरीत झाले तरीही त्यांना त्या ठिकाणच्या रेशन दुकानांमधून धान्य वितरीत केले जाणार आहे.

राज्य शासनाने 151 तालुके, 268 महसूल मंडळे आणि 931 गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या सर्व दुष्काळग्रस्त भागातील पात्र नागरिकांना सवलतीच्या दरात धान्य देणे सोयीचे व्हावे म्हणून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमानुसार शासनाने निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समावेश नसलेल्या पिवळी व केशरी रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्य मिळण्यास पात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व नागरिकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात सध्या लाभार्थीना ई-पॉस मशीनद्वारे अन्यधान्य वितरण केले जाते, त्यासाठी त्यांची बायोमॅट्रिक ओळख पटविली जाते. यामध्ये पोर्टिबिलिटीची सोय उपलब्ध असून दुष्काळामुळे स्थलांतरित झालेल्या रेशन कार्डधारकांना त्यांच्या दुकानातून धान्य घेणे शक्‍य नसल्यास त्यांना त्यांच्या सोईनुसार अन्य कोणत्याही रेशन दुकानांमधून धान्य घेता येईल. पात्र, लाभार्थी धान्य मिळण्याच्या त्यांच्या हक्‍कांपासून वंचीत राहू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना शासनाने सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)