पुणे मेट्रोला २ भुयारी मार्ग सापडले, पण काँग्रेसला एक उमदेवार सापडेना- भाजप

पुणे: लोकसभा निवडणुकीचे पडघम जोराने वाजू लागले असतानाही अद्याप पुण्यात शांतता आहे. असा प्रकार पहिल्यांदाच पुण्यात घडला असून, कॉंग्रेसने अजूनही उमेदवार जाहीर केला नाही. दरम्यान,  पुणे मेट्रोला २ भुयारी मार्ग सापडले पण काँग्रेसला एक उमदेवार सापडेना, अशी मिश्किल टीका भाजपने काँग्रेसवर केला.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाल्यानंतर पुण्याची जागा कॉंग्रेसला देण्यात आली. वास्तविक पुण्याच्या जागेवर या आधीपासूनच कॉंग्रेसचा दावा होता. त्यानुसार कॉंग्रेसने उमेदवार जाहीर करणे आवश्‍यक होते. भाजपने पुण्यात गिरीश बापट यांची उमेदवारी जाहीर केली. परंतु कॉंग्रेसचा उमेदवाराविषयीचा निर्णय अद्याप झाला नाही. गेल्या तीन दिवसांपासून कॉंग्रेस भवनात कार्यकर्ते उमेदवाराचे नाव घोषित होण्याकडे कान लावून बसले आहेत. उमेदवार कोण? याविषयीचीच चर्चा कॉंग्रेस भवनात रंगू लागली आहे. त्यातून वेगवेगळी नावे समोर येत असल्याने तर्कवितर्कांना अधिकच उधाण आले आहे. एक नाव पुढे आले की, काही वेळाने दुसरे नाव पुढे येते असा प्रकार गेले तीन दिवस सुरू आहे. त्यामुळे उमेदवाराच्या नावाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1111936168617099264

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)