पुणे – “एमबीए आणि एमएमएस’ या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या सीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना मिळालेले गुण व पर्सेटाईलनुसार निकाल तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत “एमबीए आणि एमएमएस’ प्रवेशासाठी सीईटी घेण्यात आली होती. ही सीईटी 9 व 10 मार्च रोजी झाली होती. या सीईटीसाठी 1 लाख 11 हजार 846 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. राज्य व राज्याबाहेरील एकूण 127 केंद्रावर ऑनलाइन परीक्षा झाली. 1 लाख 2 हजार 851 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या सर्वांचा निकाल संकेतस्थळाव उपलब्ध आहे. सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांनाच एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो.
दोघे टॉपर
पॅट्रिक डिसोझा आणि प्राप्ती शहनबाग यांनी एमबीए सीईटीत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. या दोघांना सीईटीत 164 गुण प्राप्त झाले आहेत. तर तब्बल 24 विद्यार्थ्यांना सीईटीत शून्य गुण मिळाले आहेत, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आली.