कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही

प्रदीप पवार : घोडेगाव येथे विद्यार्थ्यांशी साधला संवाद

मंचर – मुलींवरील अन्याय व छेडछाड या संदर्भात पोलिसांकडून धडक कारवाई केली जाईल. रॅगिंग कायदा, महिला विषयक कायदे, मोटार वाहन कायदा इत्यादी कायद्यांच्या विरोधात वागणाऱ्या व्यक्ती असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही असे मत सहायक पोलीस निरिक्षक प्रदीप पवार यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित घोडेगाव येथील बी. डी. काळे महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींशी संवाद साधताना सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार बोलत होते. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर, संदीप बोरकर, प्राचार्य डॉ. आय. बी. जाधव, महिला दक्षता समितीच्या ऍड. गायत्री काळे इत्यादींनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महिला दक्षता समितीच्या रत्ना गाडे, वत्सलाबाई काळे, वंदना सैद, महिला हवालदार किर्वे, उपप्राचार्य बी. एम. पवार, डॉ. छाया जाधव, प्रा. भाऊसाहेब थोरात आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे हे वय शिकण्याचे व चांगले करिअर करण्याचे आहे. गुन्हे दाखल होण्याचे नाही. विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास ते नोकरीपासून व पासपोर्ट पासून वंचित राहू शकतात. मुलींनी तर स्वसंरक्षणासाठी झाशीच्या राणीचा आदर्श ठेवला पाहिजे. विद्यार्थ्यांनी गैरमार्गाकडे जाऊन आई वडिलांचा विश्‍वासघात करू नये.
-किरण भालेकर, पोलीस उपनिरीक्षक

मुलींवरील अन्याय व छेडछाड या संदर्भात पोलिसांकडून धडक कारवाई केली जाईल. रॅगिंग कायदा, महिला विषयक कायदे, मोटार वाहन कायदा इत्यादी कायद्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. स्वागत व प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब गव्हाळे यांनी तर सुत्रसंचालन व आभार गणेश काळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)