पुणे – विद्यार्थ्यांमार्फत पालकांपर्यंत दिले जातेय पत्र

मतदान जनजागृतीसाठी आयोगाचा “फंडा’ : पथनाट्य, प्रभात फेरी, फ्लॅश मॉबद्वारेही जागृती

पुणे – लोकसभा निवडणुकीमध्ये अधिकाधिक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, याच्या जनजाग़ृतीसाठी जिल्हा प्रशासनाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना मार्फत “मी मतदान करणार’ या संकल्पाचे पत्र पालकांपर्यंत पोहचविले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने सुमारे साडेपाच लाख विद्यार्थ्यांना या पत्राचे वाटप केले आहे. त्यामुळे यापत्राद्वारे “बाबा, मतदान करा.’ अशी विनंती आता मुले पालकांकडे करणार आहे.

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा जिल्हा प्रशासनाचा उद्देश आहे. त्यासाठी जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये महाविद्यालयांमध्ये नवमतदारांनी मतदान करावे, यासाठी नवमतदार साक्षरता मंडळ स्थापन करून त्याद्वारे मतदान प्रक्रियेची माहिती, मतदान जागृतीविषयक पथनाट्य, प्रभात फेरी, फ्लॅश मॉब आदींच्या माध्यमातून मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारे सुभाष बोरकर यांनी दिली.

विविध माध्यमातून जिल्हा प्रशासन अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना संकल्प पत्र दिले आहे. सुमारे 5 लाख 50 हजार विद्यार्थ्यांना संकल्प पत्राचे वाटप करण्यात आले आहे. हे विद्यार्थी पालकांकडून “मी मतदान करणार’ अशा आशयाचे संकल्प पत्र भरून घेणार आहे. त्यामुळे मतदारांमध्ये जागृती होऊन अधिकाधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील, असा विश्‍वास जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला अहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here