पुणे – पुन्हा बिबट्याचा थरार! मंदिराचा पुजारी जखमी

खडकवासला – पानशेत रस्त्यावरील निगडे मोसे-ओसाडे भागात बुधवारी रात्रीपासून बिबट्याचा थरार सुरू आहे. या बिबट्याने शिवकालीन ओसाडजाई देवीच्या मंदिरातील पुजाऱ्यावर हल्ला करून जखमी केले आहे. छबन महादेव जोरकस (वय-66) हे मंदिरातील ओसरीवर झोपले असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

यासंदर्भता माहिती अशी की, जोरकस हे बुधवारी रात्री मंदिराच्या ओसरीवर झोपले होते. गाढ झोपेत असताना त्यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने पुजारी जोरकस यांच्या तोंडाचे लचके काढले आहेत. जोरकस यांच्या आवाजाने त्यांची बायको आणि मूलगा बाहेर आले. समोर बिबट्याला पाहून घाबरलेल्या अवस्थेत मदतीसाठी ओरडू लागले. त्यांच्या आवाजाला घाबरून बिबट्या तेथून घाबरून पळ काढला. नंतर जोरकस यांना त्यांच्या पत्नीने आणि मुलाने खडकवासला येथील खासगी दवाखान्यामध्ये दाखल केले. गुरूवारी सकाळी अकराच्या सुमारास निगडे मोसे येथील एका शेतात बिबट्याने हैदोस घातला. सकाळपासून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील दोन्ही गावात बिबट्याचे दर्शन झाल्याने गावकरी भयभीत झाले आहेत.

या बिबट्याने पिकाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्यावरही हल्ला केला आहे. मात्र, सुदैवाने शेतकरी वाचला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याचे पथक तैनात केले आहे. वेल्हे तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी जे. एच. मुलाणी, एस. डी. भोकरे यांच्यासह अधिकारी कर्मचारी सकाळपासून या ठिकाणी तैनात आहेत. तीन दिवसांपूर्वी पानशेत धरणाजवळील कादवे -शिर्केवाडी येथे एका बिबट्याला वनखात्याने जेरबंद केले होते. ओसाडजाई मंदिराच्या परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे असल्याचे भोकरे यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)