पुणे – उमेदवारी जाहीर करण्यास उशीर; कॉंग्रेसमधील इच्छुकांची नाराजी

File photo

पुणे – अद्यापही उमेदवारी जाहीर न केल्याने कॉंग्रेसमधील इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे. एवढ्या उशीरा नावे जाहीर केल्यास स्वत: केलेल्या विकासकामांच्या जोरावर नव्हे तर फक्त “हात’ घेऊनच लढावे लागेल, अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे.

बाहेरून उमेदवार आयात करण्यात येणार असल्याची चर्चा पक्ष पातळीवर जोरदार सुरू आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आधीच मानसिक खच्चीकरण झाले आहे. इच्छुकांनी तर नाराजीच व्यक्त केली आहे.

-Ads-

पक्षाने या गोष्टींचा विचार वास्तविक एक वर्षे आधी करायला पाहिजे आणि त्या दृष्टीनेच उमेदवाराला तयारी करण्यास सांगायला हवे, परंतु तसे न झाल्याने इच्छुकांची लढण्याची मानसिकता कमी होत चालली आहे. एक वर्षांचा कालावधी दिल्यास तो मतदार संघात किमान कामाला सुरुवात करू शकतो. आपले काम मतदारांना दाखवू शकतो. मात्र, आता “लढ’ असे म्हटल्यास केवळ “हात’ घेऊन “पंजा’च्याच भरवशावर निवडणूक लढवावी लागणार आहे.

सहयोगी पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी बारामती आणि अन्य मतदार संघांत प्रचार करण्यासाठी जातील. अशा परिस्थितीत एवढ्या उशीरा उमेदवारी जाहीर झाल्यास या सगळ्या गोष्टींची सांगड घालणे अवघड होणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)