पुणे – खराडी, बाणेर, कोथरुडच भारी!

शहरात 10 महिन्यांत 39,598 दस्त नोंदणी

पुणे – शहरात एप्रिल ते डिसेंबर 2018 अखेरपर्यंत खरेदी-विक्रीचे एकूण 39 हजार 598 दस्त नोंदविण्यात आले आहे. या आकडेवारीवरून शहरातील खराडी, बाणेर, कोथरुड, बाणेर आणि कोंढवे बुद्रक या ठिकाणी घर खरेदी करण्यास नागरिकांनी प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले आहे.

शहरात 16 पेठा आणि 40 गावांचा समावेश होतो. या प्रत्येक गाव आणि पेठनिहाय झालेले घरांच्या खरेदी-विक्रीची दस्तसंख्या नोंदणी विभागाने अभ्यासली. त्या आधारे रेडी रेकनरचे दर निश्‍चित करण्यास मदत होते. तसेच कोणत्या भागात घर खरेदी करण्यास नागरिकांची पसंती आहे. हा कल लक्षात येतो.

शहरात पेठांपेक्षा उपनगरांमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार जास्त होत असल्याचे दिसून आले आहे. शहरातील मध्यवस्ती भागात सर्वाधिक व्यवहार हे सदाशिव पेठेमध्ये झाले आहेत. सदाशिव पेठेत खरेदी-विक्रीचे 426 दस्त नोंदविले गेले आहेत. त्यापाठोपाठ शुक्रवार पेठ परिसरात 276 दस्त नोंदविण्यात आले आहेत.

तर, उपनगरांमध्ये खराडी भागात सर्वाधिक खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत. खराडी परिसरात 2 हजार 585 दस्त नोंदविले आहेत. कोंढवे बुद्रुक येथे 2 हजार 217, बाणेरमध्ये 2 हजार 424, हडपसरमध्ये 1 हजार 995, कोथरुडमध्ये 1 हजार 954 आणि कात्रजपरिसरात 1 हजार 934 दस्तांची नोंदणी झाली आहे. यावरून खराडी, बाणेर, कोथरुड या भाग खरेदी करण्यास “फेव्हेरिट’ ठरत असल्याचे दिसून येते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)