कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य प्रेरक – डाॅ. सांगोलेकर

केडगाव – सध्या समाजात खोटे बोलणे आणि हिंसा करणे यांचा वाईट प्रवृत्तीकडून पदोपदी वापर होत असून हे भीषण चित्र बदलायलाचे असल्यास महात्मा गांधी आणि कर्मवीर भाऊराव पाटील या दोघांचे कार्य प्रेरक असल्याचे मत प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी व्यक्त केले.

खुटबाव (ता. दौंड) येथील भैरवनाथ विज्ञान महाविद्यालयात या दोन्ही महान विभूतींच्य जयंती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून भाषण देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारीत बापू ही गजल सादर केली. त्यानंतर प्राध्यापक धनंजय भिसे यांचेही भाषण झाले. या निमित्ताने विद्यार्थ्यांमधून वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली, त्यामध्ये अकरा स्पर्धकांनी भाग घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पूजा पवार, प्रियंका देशमुख, मोहिनी थोरात यांनी क्रमांक पटकावले. परीक्षण व मार्गदर्शन प्राध्यापक सलमान शेख, धनंजय भिसे, शीतल पोवळे, कोमल सोनवने यांनी केले. सूत्रसंचालन ऋषीकेश पवार यांनी, तर आभार निखि हौले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय जाधव, समीर भुजबळ, निरंजन खेनट, स्वप्नील थोरात यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)