पुणे – कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत तसेच मानाचा पहिला गणपती आहे. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 1893मध्ये सुरूवात झाली. श्री कसबा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा 126वे वर्ष साजरे करत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदादेखील श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मिरवणूकीद्वारे केली जाणार आहे. सकाळी 8:30 वाजता या मिरवणुकीला प्रारंभ होईल. त्यानंतर 9.15 वाजता पार्सेकर मूर्तीवाले यांच्याकडून श्रींची मूर्ती घेऊन ही मिरवणूक पुन्हा उत्सवमंडपात येणार आहे.  श्री कसबा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा ‘मयूरमहाल’ साकारला आहे.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)