आयरिसर्च संघाची ऍटॉससमोर शरणागती

पुणे आयटी कप क्रिकेट स्पर्धा 2018

पुणे – गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर ऍटॉस संघाने पुणे आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धेत आयरिसर्च संघावर 71 धावांनी सहज मात केली. ऍटॉस संघाने दिलेल्या 146 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयरिसर्चचा डाव 74 धावांत संपुष्टात आला.

पिंपरी-चिंचवड येथील पीसीएमसी व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट ऍकॅडमीच्या मैदानावर ही लढत झाली. ऍटॉस संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 5 बाद 145 धावा केल्या. ऍटॉसची सुरुवात चांगली झाली नव्हती. मात्र, मधल्या फळीतीली फलंदाजांनी ऍटॉसचा डाव सावरला. यात हर्षद तिडकेने 41 चेंडूंत 8 चौकारासह 43 धावा केल्या.

त्याला वैभव पेंडणेकर आणि महेश भोसलेची चांगली साथ मिळाली. वैभवने 20 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकारसह 27, तर महेश भोसलेने 24 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 36 धावा केल्या. यानंतर ऍटॉसच्या गोलंदाजांसमोर आयरिसर्चच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही आणि आयरिसर्चचा डाव 14.5 षटकांत 74 धावांतच संपुष्टात आला.

आयरिसर्चच्या केवळ एका फलंदाजास दुहेरी धावसंख्या गाठता आली. त्यांचा निम्मा संघ 40 धावांतच माघारी परतला होता. हर्षद तिडकेने फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजीतही चमक दाखवून तीन गडी बाद केले.
बार्कलेजचा विजय

दुसऱ्या लढतीत बार्कलेज संघाने स्प्रिंगर नेचर संघावर सात गडी राखून मात केली. स्प्रिंगर नेचर संघाचा डाव 18.1 षटकांत 131 धावांत संपुष्टात आला. यानंतर बार्कलेज संघाने विजयी लक्ष्य दत्तात्रय रौतीच्या अर्धशतकाच्या जोरावर 16.3 षटकांत 3 गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले.

संक्षिप्त धावफलक :

1) ऍटॉस – 20 षटकांत 5 बाद 145 (हर्षद तिडके 43, महेश भोसले नाबाद 36, वैभव पेंडणेकर 27, चिन्मय माळवणकर 18, ऋषीकेश साळुंके 2-20, अशोक अय्यर 1-17, प्रशांत चव्हाण 1-20, अभिषेकसिंग 1-19) वि. वि. आयरिसर्च – 14.5 षटकांत सर्व बाद 74 (संजय खेर 20, हर्षद तिडके 3-8, मंगेश सांगोडकर 2-12, रुपेश खिराड 2-14, ईशान नारंग 2-18).
2) स्प्रिंगर नेचर – 18.1 षटकांत सर्व बाद 131 (पीयूष पाटील 34, अविनाश आंबळे 32, प्रमोद मोडक 25, शिवाजी अंकापल्ली 4-24, कनिष्कसिंग 2-15, सागर अगरवाल 2-24, अनुप पेरा 1-8) पराभूत वि. बार्कलेज – 16.3 षटकांत 3 बाद 135 (दत्तात्रय रौती 58, सागर अगरवाल नाबाद 32, राजीव शेखर 2-23, अविनाश आंबळे 1-15).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)