पुणे आयटी कप टी20 क्रिकेट स्पर्धा : टीसीएस, अटॉस संघ उपान्त्यपूर्व फेरीत

पुणे – टीसीएस, अटॉस, यार्डी सॉफ्टवेअर, सिमन्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून येथे सुरू असलेल्या प्रथम स्पोर्टस आयोजित पुणे आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पिंपरी-चिंचवड येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत पहिल्या लढतीत टीसीएस संघाने व्हेरिटास संघावर एक गडी राखून मात केली.

सुशांत मुळे आणि स्वानंद भागवत यांच्या अर्धशतकांच्या जोरावर व्हेरिटास संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 155 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल टीसीएस संघाने 9 गडींच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य अखेरच्या षटकात पूर्ण केले. दुस-या लढतीत अटॉस संघाने इंडियन बॅंक संघावर 9 गडी राखून सहज मात केली. अटॉस संघाने इंडियन बॅंक संघाला 6 बाद 155 धावांत रोखले. यानंतर विजयी लक्ष्य 18.1 षटकांत 1 गडीच्या मोबदल्यात पूर्ण केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यात चिन्मय मालवणकरने 59 चेंडूंत 11 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 85 धावा केल्या. तिस-या लढतीत यार्डी सॉफ्टवेअर संघाने एचएसबीसी संघावर सात गडी राखून मात केली. चौथ्या लढतीत सिमन्स संघाने केपीआयटी संघावर 74 धावांनी मात केली. सिमन्स संघाने 7 बाद 193 धावांपर्यंत मजल मारली. लक्ष्याचा पाठलाग करताना केपीआयटी संघाला 9 बाद 119 धावाच करता आल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

संक्षिप्त धावफलक :

1) व्हेरिटास 20 षटकांत 4 बाद 155 (सुशांत मुळ्ये 69, स्वानंद भागवत 53, तेजपालसिंग 1-29) पराभूत वि. टीसीएस 20 षटकांत 9 बाद 156 (निकुंज अगरवाल नाबाद 41, सुनील बाबर 36, देव रॉबीन चौधरी 3-24, कपिल कुरळेकर 2-30, मुनिराज तोमर 2-18).

2) इंडियन बॅंक 20 षटकांत 6 बाद 155 (विजय के. नाबाद 49, आदित्य साळुंखे 38, रुपेश खिराड 2-14, हर्षद तिडके 2-32, महेश भोसले 1-19) पराभूत वि. अटॉस 18.1 षटकांत 1 बाद 157 (चिन्मय मालवणकर नाबाद 85, महेश भोसले नाबाद 33, आदित्य साळुंखे 1-18).

3) एचएसबीसी 20 षटकांत 6 बाद 161 (संजय लोखंडे 59, नवीद श्रीनिवास 29, प्रभुल पीके 2-30, गौतम तुळपुळे 1-38, पंकज एल. 1-37) पराभूत वि. यार्डी सॉफ्टवेअर 17.3 षटकांत 3 बाद 164 (पंकज एल. नाबाद 76, पार्थ शहा 26, नवीद श्रीनिवास 2-34).

4) सिमन्स 20 षटकांत 7 बाद 193 (सौम्य मोहंती 61, रोहन पवार 43, विशाल रैना 33, वनराज परमार 2-27, प्रशांतकुमार 2-42) वि. वि. केपीआयटी 20 षटकांत 9 बाद 119 (कमलेश सुर्वे 35, तुषार वैंगणकर 23, नमन शर्मा 4-18, मनोज भागवत 3-22).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)