पुणे आयटी कप क्रिकेट स्पर्धा : मर्क्‍स, परसिस्टंट आणि सायबेज संघांची आगेकूच

पुणे  – वैभव महाडिकच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर मर्क्‍स संघाने टीएटो संघावर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. तर, इंडियन बॅंक, परसिस्टंट, सायबेज या संघांनीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत येथे सुरु असलेल्या पुणे आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली आहे.

यावेळी झालेल्या पहिल्या लढतीत टिएटो संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 130 धावा केल्या. यावेळी, प्रत्युत्तरात खेळणाऱ्या मर्क्‍स संघाच्या वैभव-राघव जोडीने हे विजयी लक्ष्य 16.1 षटकांतच पूर्ण केले. वैभव महाडिकने 52 चेंडूंत 7 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 81 धावा केल्या, तर राघव त्रिवेदीने 46 चेंडूंत 5 चौकारांसह नाबाद 43 धावा केल्या.

तर, दुसऱ्या लढतीत इंडियन बॅंक संघाने व्हेरिटास संघावर सहा गडी राखून विजय मिळवला. तर, परसिस्टंट संघाने डॉइश्‍च बॅंक संघावर सात गडी राखून मात केली. तर, सायबेजच्या संघाने झेन्सर ऍकेडमीचा 90 धावांनी पराभव करत विजयी आगेकूच नोंदवली.

संक्षिप्त धावफलक –

1) टिएटो – 20 षटकांत 6 बाद 130 (धनाजी कळके 36, प्रशांत दुधाणे 22, गणेश आंब्रे 21, अंकित जैन नाबाद 15, अभिषेक राय 2-14, प्रसाद गिरकर 1-25) पराभूत वि. मर्स्क – 16.1 षटकांत बिनबाद 131 (वैभव महाडिक नाबाद 81, राघव त्रिवेदी नाबाद 43).

2) व्हेरिटास – 20 षटकांत 7 बाद 144 (कपिल कुरळेकर नाबाद 33, ललित शर्मा 25, विश्वजित उधाण 2-25, तुषार खिरिड 2-25, सुजित गायकवाड 2-17) पराभूत वि. इंडियन बॅंक – 18.4 षटकांत 4 बाद 148 (अर्जुन शिंदे नाबाद 77, विश्वजित नाबाद 23, सुमित दिघे 2-19, अमरित अलोक 1-28).

3) डॉइश्‍च बॅंक – 19.4 षटकांत सर्वबाद 116 (संकेत शास्त्री 31, प्रथमेश थोरात 20, हर्ष छाब्रा 20, अनुराग हंबिर 3-28, अमरप्रीत जसपाल 3-16, अमोल माने 2-16) पराभूत वि. परसिस्टंट – 16.2 षटकांत 3 बाद 118 (कौस्तुभ काळे 49, सिद्धार्थ गोखले 39, सुधीर परांजपे नाबाद 10, राजशेखरण सी. 1-34, भंवरलाल भट्टी 1-7).

4) सायबेज – 20 षटकांत 5 बाद 180 (प्रतीक पंडित 65, सौरभ रावल 51, माझ शेख 21, अकिब पीरझादे 3-24, अनिल पेनूगंटू 1-39, मुझमिल खान 1-24) वि. वि. झेन्सर – 17.5 षटकांत सर्वबाद 90 (भरत झव्हेरी 39, अकिब पीरझादे 13, सौरभ रावल 2-14, निखिल गिरासे 2-16, राकेश शिंदे 2-27, प्रतीक पंडित 2-0).

5) अटोससिंटेल – 19.5 षटकांत सर्वबाद 141 (तन्मय पाडवे 27, अजितकुमार प्रधान 21, उज्ज्वल ठुसू 19, सचिन शेलार 3-24, तनिष ठस्कर 2-29, अजय पाटील 1-27, केतन घाडगे 1-21) पराभूत वि. सीबीएसएल – 18 षटकांत 5 बाद 143 (अतिफ 50, मनीष 41, सबिर शेख, अभिनव आनंद 1-21).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)