पुणे 36.2 अंश सेल्सिअस

पुणे – राज्यात उन्हाचा चटका वाढू लागल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. कोकण वगळता राज्यातील बहुतांशी भागांत कमाल तापमानाच्या पाऱ्याने पस्तीशी ओलांडली आहे. गेल्या आठवड्यात कडाक्‍याच्या थंडीनंतर उन्हाचा ताप असह्य होऊ लागला आहे. पुण्यातील कमाल तापमान 36.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अंशत: ढगाळ हवामान होत असून शनिवारी मराठवाड्यात आणि विदर्भात काही भागांत पाऊस झाला. जळगाव, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा येथे तापमान 37 अंश सेल्सिअसवर गेले आहे. किमान तापमानातही वाढ होत असल्याने थंडी कमी झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अरबी समुद्रावर होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. शुक्रवारी दुपारनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढग जमा झाले होते. औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड जिल्ह्यांत पुढील चोवीस तासांमध्ये तर रविवारी आणि सोमवारी विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, गोदिया जिल्ह्यांत हलक्‍या पावसाची शक्‍यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. पुणे शहर आणि परिसरात गुरुवारी दुपारनंतर ढगाळ वातावरणास सुरुवात झाली. शनिवारीही आकाश अंशत: ढगाळ होते. त्यामुळे किमान तापमानात 3.9 अंश सेलिसअसने वाढ झाली होती. पुण्यात किमान तापमान 16.6, तर कोल्हापूर येथे 22 अंश सल्सिअस तापमान नोंदले गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)