पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथाॅन : झिके अटलाव डेबेबे विजेता तर बेशा गेटाचेव उपविजेता

पुणे – पुण्यात पार पडलेल्या पद्मश्री डाॅ.बी.व्ही. राव 33 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथाॅनमध्ये इथिओपियाच्या झिके अटलाव डेबेबेने बाजी मारली. तर इथिअोपियाच्याच गतविजेत्या बेशा गेटाचेव याने उपविजेतेपद पटकावले. बेकेले अबेबा याने तृतीय स्थान पटकावले.

आज पहाटे पाच वाजता सारसबागेजवळील सणस क्रीडांगणापासून मॅरेथाॅनला सुरूवात झाली. पुरूषांच्या मॅरेथाॅनमध्ये डेबेबेने 2 तास 17 मि. व 17 सेंकद तर बेशा गेटाचेव याने 2 तास 18 मि. व 07 सेंकद अशी वेळ नोंदविली. तिसऱ्या क्रंमाकावरील बेकेले याने 2 तास 18 मि. व 38 सेकंद वेळ नोंदविली.

महिलांमध्ये 42.195 किमी अंतराची शर्यत केनियाच्या पास्कलिया चेप्कोगेइने जिंकली. तर इथिओपियाच्या बेलेव असर मेकोनेनने दुसरा आणि इथिओपियाचीच फेकेडे सिमेन तिलाहूनने तिसरा क्रमांक मिळविला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)